Home Bibles उत्पत्ति 30:20 · मराठी बायबल
उत्पत्ति 30:20 · मराठी बायबल

ती म्हणाली, “देवाने मला उत्तम देणगी दिली आहे; आता मात्र माझा नवरा प्रेमाने माझा स्वीकार करील कारण मी त्याला सहा मुलगे दिले आहेत;” म्हणून लेआने त्याचे नाव जबुलून ठेवले.

Cross references

उत्पत्ति 29:34

लेआ आणखी गर्भवती झाली व तिला मुलगा झाला; तेव्हा तिने त्याचे नाव लेवी असे ठेवले; कारण ती म्हणाली, “आता मात्र माझा नवरा माझ्यावर नक्की प्रेम करील कारण मी त्यांना तीन मुलगे दिले आहेत.”

उत्पत्ति 30:15

लेआने उत्तर दिले, “अगोदरच तू माझा नवरा घेतलास तर घेतलास, आणि आता माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुलेही तू माझ्याकडून घेण्याचा प्रयत्न करतेस काय?”परंतु राहेल म्हणाली, “जर तुझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुले मला देशील तर त्यांच्या मोबदल्यात आज रात्री तुला याकोबापाशी निजावयाला मिळेल.”

उत्पत्ति 35:23

लेआ हिचे मुलगे - याकोबाचा पाहिला मुलगा रऊबेन आणिशिमोन, लेवी, यहुदा, इस्साखार व जबुलून;

उत्पत्ति 46:14

जबुलूनाचे मुलगे; सेरेद, एलोन व याहलेल.

उत्पत्ति 49:13

“जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल; त्याचा समुद्र किनारा जहाजासाठी सुरक्षित बंदर असेल. त्याच्या जमिनीची हद्द सिदोन नगरपर्यंत असेल.”

अनुवाद 27:13

तसेच रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान व नफताली यांनी शाप वाचून दाखवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.

शास्ते 4:10

तेथे बाराकने जबुलून आणि नफताली यांच्या वंशातील लोकांना बोलावून दहाहजार जणांना घेतले. दबोराही बाराक बरोबर होती.

शास्ते 5:14

अमाले कच्या डोॅगराळ प्रदेशातून एफ्राइमचे लोक आले. हे बन्यामीन तुमच्या पाठोपाठ ते आले माखीरच्या वंशातूनही सेनापती आले. जबुलूनच्या लोकांतील सरदार तांब्याचा अधिकारदंड घेऊन आले.

स्तोत्रसंहिता 68:27

छोटा बन्यामीन त्यांचे नेतृत्व करीत आहे आणि तेथे यहूदाचे मोठे कुटुंब जबुलूनाचे नेते आणि नफतालीचे नेते आहेत.

मत्तय 4:13

परंतू तो नासरेथ येथे राहिला नाही, तर गालील सरोवराजवळील कफर्णहूम नगरात जाऊन राहिला. जबुलून व नफताली ह्या प्रदेशांना लागुनच कफर्णहूम नगर आहे.

Interlinear

Choose Theme