Home Bibles उत्पत्ति 21:9 · मराठी बायबल
उत्पत्ति 21:9 · मराठी बायबल

ह्याच्या आधी साराची मिसर देशाची दासी हागार हिने अब्राहामापासून एका मुलाला जन्म दिला होता; अब्राहाम त्याचाही बाप होता. परंतु आता साराने पाहिले की तो आधीचा मुलगा इसहाकाला चिडवत होता.

Cross references

उत्पत्ति 16:1

अब्राम व त्याची बायको साराय यांना मुलबाळ नव्हते. साराय हिची हागार नावाची एक मिसरी म्हणजे मिसर देशाची एक दासी होती.

उत्पत्ति 16:3

कनान देशात अब्राम दहा पर्षे राहिल्यावर हे झाले आणि सारायने आपली मिसरी मोलकरीण हागार आपला नवरा अब्राम याला बायको म्हणून दिली.

उत्पत्ति 16:15

हागारेला अब्रामापासून मुलगा झाला; अब्रामाने त्याचे नाव इश्माएल ठेवले.

उत्पत्ति 17:20

“तू मला इश्माएल विषयी विचारलेस ते मी ऐकले; मी त्याला आशीर्वाद देईन; त्याला भरपूर संतती होईल; बारा महान सरदारांचा तो पिता होईल; त्याचे कुटुंब म्हणजे एक मोठे राष्ट्र होईल;

2 राजे 2:23

अलीशा मग त्या नगरातून बेथेलला आला. तो डोंगर चढून जात होता आणि काही मुले गावातून डोंगर उतरत होती. त्यांनी अलीशाची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.”

2 इतिहास 30:10

एफ्राइम आणि मनश्शेच्या प्रदेशात निरोप्ये गावोगाव फिरले. ते पार जबुलून पर्यंत गेले. पण लोकांनी मात्र उपहासाने वागून त्यांची हेटाळणी केली.

2 इतिहास 36:16

पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले.

नहेम्या 4:1

आम्ही यरुशलेमचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटच्या कानावर गेले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला. त्याने यहूद्यांचा उपहास करायला सुरुवात केली.

ईयोब 30:1

परंतु आता माझ्यापेक्षा लहान माणसे देखील माझी थट्ट करत आहेत. आणि त्याचे पूर्वज इतके कवडी मोलाचे होते की मी त्यांना माझ्या मेंढ्यांची राखण करणाऱ्या कुत्र्यांमध्ये देखील ठेवले नसते.

स्तोत्रसंहिता 22:6

म्हणून मी कीटक आहे का? मी मनुष्य नाही का? लोकांना माझी लाज वाटते, लोक माझा तिरस्कार करतात.

स्तोत्रसंहिता 42:10

माझ्या शत्रूंनी मला मारण्याचा प्रयत्न केला. “तुझा देव कुठे आहे?” असे जेव्हा ते मला विचारतात तेव्हा ते माझा तिरस्कार करत आहेत असे दाखवतात.

स्तोत्रसंहिता 44:13

तू शेजाऱ्यांमध्ये आमचे हसे केलेस. आमचे शेजारी आम्हाला हसतात. ते आमची मस्करी करतात.

नीतिसूत्रे 20:11

लहान मूल सुध्दा आपल्या कृतीने आपण चांगले आहोत की वाईट ते दाखवू शकते. त्या मुलाकडे लक्षपूर्वक पाहून तो प्रामाणिक आणि चांगला आहे की नाही ते तुम्ही समजू शकता.

विलापगीत 1:7

यरुशलेम मागचा विचार करते. यरुशलेमला ती दुखावली गेल्याची व बेघर झाल्याची आठवण आहे. पूर्वी तिच्याजवळ असलेल्या चांगल्या गोष्टींचे तिला स्मरण आहे. तिच्या लोकांना शत्रूने पकडल्याचे तिला स्मरते तिला मदत करणारे कोणीही नव्हते हेही तिला आठवते. तिचे शत्रू तिला पाहताच हसले. कारण तिचा नाश झाला

गलतीकरांस 4:22

असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होते. एक त्याला गुलाम मुलीपासून झाला व दुसरा स्वतंत्रस्त्रीपासून जन्मलेला

इब्री लोकांस 11:36

काहींना निंदा व चाबकाचा मार सहन करावा लागला. तर काहींना बेड्या व तुरूगंवास भोगावे लागले.

Interlinear

Choose Theme