गलतीकरांस 4:22 · मराठी बायबल
असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होते. एक त्याला गुलाम मुलीपासून झाला व दुसरा स्वतंत्रस्त्रीपासून जन्मलेला
Cross references
उत्पत्ति 16:2
साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून रोखले आहे तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा, तिच्यापोटी जन्मलेले मूल माझेच मूल आहे असे समजून मी ते स्वीकारीन.”अब्रामाने आपली बायको साराय हिचे म्हणणे मान्य केले.
उत्पत्ति 16:15
हागारेला अब्रामापासून मुलगा झाला; अब्रामाने त्याचे नाव इश्माएल ठेवले.
उत्पत्ति 21:1
परमेश्वराने साराला दिलेले वचन पाळले व पूर्ण केले.
उत्पत्ति 21:10
तेव्हा सारा अब्राहामाला म्हणाली, “त्या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या; आपल्या मरणानंतर आपल्या मालमत्तेचा वारस इसहाक होईल; या दासीचा मुलगा इसहाकाबरोबर आपल्या मालमत्तेचा वाटेकरी व तुमचा वारस होणार नाही.”