इसहाक वाढत राहिला, तो दुधाऐवजी जेवण घेण्याइतक्या वयाचा झाला तेव्हा त्याचे दूध तोडण्याच्या प्रसंगी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली.
Cross references
परंतु लोट त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करीतच राहिला; तेव्हा देवदूतांनी त्याची विनंती मान्य केली व ते त्याच्या घरी मुक्कामास गेले. लोट याने त्यास पिण्यास पाणी दिले, त्याने त्यांच्यासाठी भाकरी केल्या व ते जेवले.
तेव्हा इसहाकाने त्यांना मेजवानी दिली; त्यांनी आनंदाने भरपूर खाणे पिणे केले,
तेव्हा लाबानाने तेथील सर्वलोकांस मेजवानी दिली;
तीन दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवक वर्गाला एक मेजवानी दिली; त्यावेळी त्याने त्या आचाऱ्याला व प्यालेबरदाराला तुरुंगातून सोडले.
मग शमशोनचे वडील त्या पलिष्टी मुलीला पाहायला गेले. तेव्हा वराने मेजवानी द्यायची पध्दत होती त्याप्रमाणे शमशोनने मेजवानी दिली.
त्यांना शमशोन म्हणाला, “मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ही मेजवानी सात दिवस चालणार आहे. मी तुम्हाला एक कोडे घालतो, त्याचे उत्तर त्या कालावधीत शोधून काढा तुम्हाला या कोढ्याचा अर्थ सांगता आला तर मी तुम्हाला तीस सुती अंगरखे आणि तीस पोशाख देईन.
हन्ना मात्र गेली नाही. ती म्हणाली, “मुलगा जेवण खाऊ शकेल इतपत मोठा झाला की मी त्याला शिलोला घेऊन जाईन. त्याला परमेश्वराला वाहीन. तो नाजीर होईल. मग तो तिथेच राहील.”
तो पुरेसा मोठा झाल्यावर हन्ना त्याला शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात घेऊन आली. तिने तीन वर्षाचा एक गोऱ्हा वीस पौंड पीठ आणि द्राक्षरसाचा बुधला हे ही आणले.
अबीगईल नाबालकडे गेली. तो घरीच होता. राजाच्या इतमामात खात पीत होता. मद्याच्या नशेत झिंगला होता व मजेत होता. तेव्हा दुसऱ्या दिवशीपर्यंत ती त्याच्याशी या विषयावर काहीच बोलली नाही.
एवढे झाल्यावर तो आपल्या बरोबर वीस जणांना घेऊन हेब्रोन येथे दावीदाकडे आला. दावीदाने अबनेर आणि त्याच्या बरोबरचे हे सर्वलोक यांना मेजवानी दिली.
शलमोन जागा झाला. परमेश्वर स्वप्नात येऊन आपल्याशी बोलला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर शलमोन यरुशलेमला जाऊन परमेश्वराच्या करारकोशापुढे उभा राहिला. शलमोनाने परमेश्वरासाठी होमार्पण केले. त्यात त्याने परमेश्वराला शांतीअर्पणे वाहिली. मग आपल्या राज्यकारभारात ज्यांची मदत झाली त्या सर्व वडिलधाऱ्यांना आणि सेवकांना मेजवानी दिली.
आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपले प्रधान आणि अधिकारी यांना मेजवानी दिली. पारस आणि मेदय या प्रांतांमधले सैन्याधिकारी आणि महत्वाचे कारभारीही त्या ठिकाणी होते.
मी अगदी अविचल आहे. माझा आत्मा शांत आहे.
मग लो-रूहमेचे दूध तुटल्यावर गोमरला पुन्हा दिवस गेले या खेपेला तिने एका मुलाला जन्म दिला.