Home Bibles नहेम्या 4:1 · मराठी बायबल
नहेम्या 4:1 · मराठी बायबल

आम्ही यरुशलेमचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटच्या कानावर गेले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला. त्याने यहूद्यांचा उपहास करायला सुरुवात केली.

Cross references

एज्रा 4:1

त्या भागातील बरेच लोक यहूदा आणि बन्यामीन यांचे विरोधक होते. बंदिवासातून आलेले लोक परमेश्वरासाठी मंदिर बांधत आहेत हे या विरोधकांना कळले तेव्हा ते जरुब्बाबेल आणि घराण्यांचे प्रमुख यांच्याकडे येऊन म्हणाले, “आम्हालाही तुमच्या बांधकामात मदत करु द्या. तुमच्याप्रमाणेच आम्हीही या देवाला मदतीसाठी विनवितो. अश्शूरचा राजा एसर हद्दोन याने आम्हाला इकडे आणल्यापासून तुमच्या या देवासाठी आम्ही होमार्पण करीत आलो आहोत.”

नहेम्या 2:10

सनबल्लट आणि तोबीया यांना माझा बेत ऐकून माहीत होता. इस्राएलींच्या मदतीसाठी कोणी एक जण आला आहे याने ते नाराज झाले व रागावले. सनबल्लट होरोन या गावचा होता आणि तोबीय अम्मोनी आधिकारी होता.

नहेम्या 2:19

पण आम्ही पुन्हा बांधकाम करत असल्याची खबर होरोनचा सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीया आणि अरबी गेशेम यांना लागली. त्यांनी अगदी नीच पातळीवर जाऊन आमचा उपहास केला. ते म्हणाले, “हे काय करताय तुम्ही? राजाविरुध्द बंड करणार आहात का?”

स्तोत्रसंहिता 35:15

परंतु मी जेव्हा चूक केली तेव्हा ते लोक मला हसले ते लोक सच्चे मित्र नव्हते. मी त्यांना नीट ओळखत देखील नव्हतो परंतु ते माझ्या भोवती गोळा झाले आणि ते त्यांनी माझ्यावर हल्ला केला.

स्तोत्रसंहिता 44:13

तू शेजाऱ्यांमध्ये आमचे हसे केलेस. आमचे शेजारी आम्हाला हसतात. ते आमची मस्करी करतात.

मत्तय 27:29

काटेरी झाडाच्या फांद्यांचा एक मुकुट तयार करून तो येशूच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक काठी दिली. मग शिपाई येशूपुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करु लागले. ते म्हणू लागले, “यहूद्याचा राजा चिरायू होवो!”

प्रेषितांचीं कृत्यें 5:17

प्रमुख याजक आणि त्याचे सर्व मित्र (सदूकी नावाचा एक गट) यांना फार हेवा वाट लागला.

इब्री लोकांस 11:36

काहींना निंदा व चाबकाचा मार सहन करावा लागला. तर काहींना बेड्या व तुरूगंवास भोगावे लागले.

Interlinear

Choose Theme