यरुशलेममधील या मंदिराच्या सेवेसाठी त्यांनी मोशेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, याजकांची आणि लेव्यांची त्यांच्या-त्यांच्या वर्गानुसार योजना केली.
Cross references
“लेवी वंशातील सर्व लोकांना अहरोन याजकाकडे आण म्हणजे ते त्याचे मदतनीस होतील.
“लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या ताब्यात दे. त्यांना सर्व इस्राएल लोकांनी अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची मदत करण्यासाठी निवडले आहे.
तू लेवी लोकांना दर्शनमंडपासमोरील अंगणात आण व मग सर्व इस्राएल लोकांना तेथे एकत्र जमव
आता दावीदाचे बरेच वय झाले होते. तेव्हा त्याने आपला मुलगा शलमोन याला इस्राएलचा राजा केले.
अहरोनच्या मुलांची वर्गवारी अशी: नादाब, अबीहू एलजार व इथामार हे अहरोनचे मुलगे.
उज्जियेलचा मुलगा मीखा. मीखाचा मुलगा शामीर.
दावीद आणि सैन्यातील अधिकारी यांनी मिळून आसाफच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती मुले. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरुप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी पुढीलप्रमाणे:
याजक आपल्या कामाला सिध्द झाले. परमेश्वराच्या भजनाची वाद्ये घेऊन लेवी ही उभे राहिले. राजा दावीदाने ही वाद्ये परमेश्वराच्या स्तवनासाठी करुन घेतली होती. “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची कृपा चिरंतन आहे” असे याजक आणि लेवी गात होते. लेवींच्या समोर उभे राहून याजक कर्णे वाजवत होते. सर्व इस्राएल लोक तिथे उभे होते.
पापल्या घराण्यांप्रमाणे तुमचा जो क्रम ठरला आहे त्यानुसार मंदिरातील सेवेसाठी सिध्द व्हा. राजा दावीद आणि त्याचा मुलगा राजा शलमोन यांनी आखून दिल्याप्रमाणे आपापली कर्तव्ये पार पाडा.
वल्हांडणाच्या उपासनेची सर्व सिध्दता झाल्यावर याजक आणि लेवी आपापल्या जागी स्थानापन्न झाले. तशी राजाज्ञाच होती.