Home Bibles 1 इतिहास 25:1 · मराठी बायबल
1 इतिहास 25:1 · मराठी बायबल

दावीद आणि सैन्यातील अधिकारी यांनी मिळून आसाफच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती मुले. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरुप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी पुढीलप्रमाणे:

Cross references

1 शमुवेल 10:5

मग तू गिबाथ एलोहिम येथे पोचशील. या ठिकाणी पलिष्ट्यांचा किल्ला आहे. या नगरात तू गेल्यावर भक्तीच्या उच्चस्थानाहून खाली येणारे संदेष्टे तुला भेटतील. भविष्य कथन करतील ते चालू असतानाच, परमेश्वराचा संचार झाल्याप्रमाणे ते नृत्य गायनात मशगुल असतील. ते सतार, संबळ, सनई, वीणा ही वाद्ये वाजवत असतील.

1 राजे 10:12

शलमोनाने या लाकडाचा वापर मंदिरात आणि महालात आधाराचे कठडे उभारायला केला. शिवाय वादकांसाठी वीणा, सतारीही त्यातून करवून घेतल्या. तसे लाकूड परत कोणी कधी इस्राएलमध्ये आणले नाही की त्यानंतर कोणी तसे लाकूड पाहिले नाही.

2 राजे 3:15

तेव्हा आता एखारुा वीणावादकाला इथे बोलावून आणा.”एक वादक येऊन वीणा वाजवू लागला तेव्हा परमेश्वराचे सामर्थ्य अलीशात आले.

1 इतिहास 6:16

गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे मुलगे.

1 इतिहास 6:33

गायनसेवा करणाऱ्यांची नावे अशी:कहाथ धराण्यातील वंशज: हेमान हा गवई. हा योएलचा मुलगा. योएल शमुवेलचा मुलगा.

1 इतिहास 6:39

आसाफ हेमानचा नातलग होता. हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे. आसाफ हा बरेख्या याचा मुलगा. बरेख्या शिमाचा मुलगा.

1 इतिहास 6:44

मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा मुलगा. किशी अब्दीचा मुलगा. अब्दी मल्लूखचा मुलगा.

1 इतिहास 12:28

सादोक ही त्यांच्यात होता. तो तरुण लढवय्या होता. आपल्या घराण्यातील बावीस सरदार त्याने बरोबर आणले.

1 इतिहास 13:8

दावीद आणि इस्राएल लोक देवापुढे जल्लोष करत चालले. देवाची स्तुतिगीते गात, वीणा, सतार, डफ झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते.

1 इतिहास 15:16

दावीदाने लेवी प्रमुखांना आपल्या गायकबंधूंना बोलावून घ्यायला सांगितले. सतार, वीणा, झांजा ही वाद्ये आणून त्यांना मंगलगीते म्हणायला सांगितले.

1 इतिहास 15:19

हेमान, आसाफ आणि एथान यांनी पितळी झांजा वाजवल्या.

1 इतिहास 15:28

अखेर सर्व इस्राएल लोकांनी करार कोश आणला. जयघोष करत रण-शिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा वाजवत त्यांनी तो आणला.

1 इतिहास 16:4

दावीदाने मग काही लेवींची करार कोशाच्या सेवेसाठी निवड केली. इस्राएलच्या परमेश्वर देवाचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम होते.

1 इतिहास 16:41

परमेश्वराची कृपा निरंतर राहावी म्हणून त्याचे स्तुतिस्तोत्र गाण्यासाठी हेमान, यदूथून व इतर लेवी यांची नेमणूक केली.

1 इतिहास 23:2

इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना दावीदाने बोलावून घेतले.

1 इतिहास 23:5

4,000 द्वारपाल होतील आणि 4,000 देवांची स्तुतिगीते गातील. त्यांच्यासाठी मी खास वाद्ये करवून घेतली आहेत. त्यांच्या साथीवर ते देवाची स्तुती करतील.”

1 इतिहास 24:5

दोन्ही घराण्यातील पुरुषांनी निवड चिठ्ठ्या टाकून केली गेली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे मुखत्यार म्हणून नेमले तर काहींना याजक म्हणून सेवेसाठी नेमले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या घराण्यातलेच होते.

1 इतिहास 25:3

यदूथूनच्या घराण्यातून गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण. यदूथूनने यांना आपल्या हाताखाली घेतले. यदूथून वीणा वाजवून संदेश देऊन, परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करत असे.

1 इतिहास 25:9

पहिली चिठ्ठी आसाफ (योसेफ) याची निघाली. त्यांची मुले आणि नातलग यांच्यातून बारा जणांची निवड झाली.दुसरी गादल्याची त्याची मुले आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले.

2 इतिहास 5:12

मग सर्व लेवी गायक वेदीच्या पूर्वेला उभे राहिले. आसाफ, हेमान आणि यदुथूनचे सर्व गायक वर्ग हजर होते. त्यांची मुले आणि भाऊबंददेखील आले होते. यासर्वांनी शुभ्र तलम वस्त्रे घातली होती. झांजा, सारंग्या आणि वीणा ही वाद्ये त्यांनी हातात घेतली होती. या लेवी गायकांबरोबर 120 याजक होते आणि ते कर्णे वाजवत होते.

2 इतिहास 8:14

आपल्या वडलांच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या. परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजकवर्गाच्या नेमणुका केल्या. लेवीना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीते म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवाकार्ये बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवींची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वराला मानणाऱ्या दावीदाने अशाच सूचना दिल्या होत्या.

2 इतिहास 23:1

यहोयादाने सहा वर्षांनंतर आपले सामर्थ्य दाखवले. त्याने यरोहामचा मुलगा अजऱ्या यहोहानानचा मुलगा इश्माएल, ओबेदचा मुलगा अजऱ्या, अदायाचा मुलगा मासेया आणि जिक्रीचा मुलगा अलीशाफाट या मुख्य अधिकाऱ्यांशी करार केला.

2 इतिहास 23:9

दावीद राजाचे भाले, छोट्या ढाली आणि मोठ्या ढाली ही शस्त्रे देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेली होती. यहोयादा याजकाने शंभर सैनिकांच्या तुकड्यांच्या प्रमुखांना त्या दिल्या.

2 इतिहास 23:13

पाहते तो तिला राजा दिसला. प्रवेशद्वाराशी तो राजस्तंभाजवळ उभा होता. कर्णे वाजवणारे कारभारी आणि लोक राजा जवळ उभे होते. देशभरचे लोक कर्णे वाजवून आनंद व्यक्त करत होते. गाणारे वाद्ये वाजवत होते आणि त्यांनी म्हटलेल्या स्तवनगीतापाठोपाठ लोक म्हणत होते. तेव्हा आपली तीव्र नापसंती दाखवण्यासाठी अथल्याने आपले कपडे फाडले आणि “फितुरी, फितुरी” असे ती ओरडली.

2 इतिहास 23:18

यहोयादाने मग परमेश्वराच्या मंदिरातील याजकांची नेमणूक केली. हे याजक लेवी होते आणि दावीदाने त्यांना मंदिराचे मुखत्यारपद दिले होते. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वराला होमबली अर्पण करणे, हे त्यांचे काम होते. दावीदाच्या आज्ञेनुसार आनंदाने गायन करत त्यांनी होमबली अर्पण केले

2 इतिहास 29:25

दावीद, राजाचा द्रष्टा गाद आणि संदेष्टा नाथान यांच्या आज्ञेबरहुकूम राजा हिज्कीयाने झांजा, सतारी व वीणा वाजवण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात लेवींची नेमणूक केली. परमेश्वराने संदेष्ट्यांमार्फत तशी आज्ञा केली होती.

2 इतिहास 31:2

लेव्यांची आणि याजकांची गटागटां मध्ये विभागणी केलेली होती. त्यापैकी प्रत्येक गटाला आपापले विशेष कामकाज नेमून दिलेले होते. राजा हिज्कीयाने त्या सर्वाना आपला कारभार हाती घ्यायला सांगितले. होमार्पणे व शांतिअर्पणे वाहणे हे लेवींचे व याजकांचे नेमलेले काम होते. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे म्हणणे व परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे ही त्यांचे काम होते.

2 इतिहास 34:12

कामगारांनी मन लावून काम केले. यहथ व ओबद्या हे मरारी कुळातील लेवी देखरेख करत होते. कहाथी वंशातील जखऱ्या आणि मशुल्लाम हे ही देखरेखीच्या कामावर होते. वाद्ये वाजवण्यात निपुण असलेले लेवीसुध्दा कारागिरांवर आणि मजुरांवर देखरेख करत होते. चिटणीस, कारभारी आणि द्वारपाल म्हणूनही काही लेवी काम करत होते.

एज्रा 2:41

गायक असे:आसाफचे वंशज 128

एज्रा 3:10

मंदिराचा पाया घालण्याचे काम पूर्ण झाल्यावर याजकांनी आपला याजकीय पोषाख घातला आणि हाती कर्णे घेतले. आसाफाच्या मुलांनी झांजा घेतल्या. भजनासाठी ते आपापल्या जागी उभे राहिले. इस्राएलचा राजा दावीद याने पूर्वींच त्यांची ही व्यवस्था ठरवून दिली होती.

एज्रा 6:18

यरुशलेममधील या मंदिराच्या सेवेसाठी त्यांनी मोशेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, याजकांची आणि लेव्यांची त्यांच्या-त्यांच्या वर्गानुसार योजना केली.

नहेम्या 11:17

मत्तन्या, (हा मीखाचा मुलगा मीखा जब्दीचा आणि जब्दी आसाफचा. आसाफ गानवृंदाचा प्रमुख होता. ईशस्तुती आणि प्रार्थनागीते म्हणताना तो आरंभ करी व लोक पाठोपाठ म्हणत.) व बकबुक्या (भाऊबंदांमध्ये त्याचा अधिकार दुसरा होता) आणि शम्मूवाचा मुलगा अब्दा, (शम्मूवा गालालाचा मुलगा, गालाल यदुथूनाचा)

नहेम्या 12:24

लेव्यांचे प्रमुख असे होते: हशब्या, शेरेब्या, कदमीएलचा मुलगा येशूवा, आणि त्यांचे भाऊ देवाची गौरव गीते आणि स्तोत्रे गाण्यासाठी हे भाऊ त्यांच्या पलीकडे उभे राहात. एक समूह दुसऱ्या समूहाला प्रत्युत्तर करी. देवाचा माणूस दावीद याची तशीच आज्ञा होती.

नहेम्या 12:27

यरुशलेमची तटबंदीची भिंत लोकांनी अर्पण केली. त्यांनी सर्व लेव्यांना यरुशलेमला एकत्र आणले. यरुशलेमची भिंत अर्पण करायच्या समारंभासाठी हे लेवी आपापल्या गावांहून आले. देवाची स्तुतिगीते आणि धन्यवादगीते गाण्यासाठी ते आले. त्यांनी झांजा, सतार व वीणा ही वाद्ये वाजवली.

नहेम्या 12:43

या खास दिवशी याजकांनी बरेच यज्ञ केले. सर्वजण अतिशय आनंदात होते. देवाने सर्वांना आनंदित केले होते. बायका आणि मुलेसुध्दा अतिशय हर्षभरित झाली होती. दूरवरच्या लोकांनाही यरुशलेममधला आनंदाचा जल्लोष ऐकू येत होता.

नहेम्या 12:45

याजक आणि लेवी यांनी देवासाठी करायची ती सर्व कृत्ये केली. लोकांच्या शुध्दीकरणाचे विधी त्यांनी पार पाडले. गायक व द्वारपाल यांनी आपली कामगिरी बजावली. दावीद आणि शलमोन यांच्या आज्ञेबरहुकूम त्यांनी सर्व यथसांग केले.

स्तोत्रसंहिता 81:2

संगीताची सुरुवात करा. डफ वाजवा. सतार आणि वीणा वाजवा.

स्तोत्रसंहिता 81:3

अमावास्येला एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. पौर्णिमेला ही एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. याचवेळी आपला सण सुरु होतो.

Interlinear

Choose Theme