Home Bibles एज्रा 6:19 · मराठी बायबल
एज्रा 6:19 · मराठी बायबल

बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडण सण पाळला.

Cross references

निर्गम 12:6

ह्या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्या मेढ्याची किंवा बकऱ्याची निगा राखावी व त्यावर लक्ष ठेवावे. चौदाव्या दिवशी सर्व इस्राएल लोकांनी कातरवेळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर व अंधार पडण्यापूर्वी आपापल्या मेंढ्याचा किंवा बकऱ्याचा वध करावा.

यहोशवा 5:10

यरीहोच्या पठारावर गिलगाल येथे मुक्काम असताना इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा सण साजरा केला. ती त्या महिन्याची चतुर्दशीची संध्याकाळ होती.

2 इतिहास 30:1

हिज्कीयाने इस्राएल आणि यहूदामधील सर्व लाकांना निरोप पाठवले: तसेच एफ्राइम आणि मनश्शेच्या लोकांना पत्रे लिहिली. इस्राएलचा परमेश्वर देव याच्याप्रीत्यर्थ वल्हांडणाचा सण साजरा करायला यरुशलेमतील परमेश्वराच्या मंदिरात यावे असे त्याने त्या निरोप पत्रांद्वारे कळवले.

Interlinear

Choose Theme