Home Bibles यहेज्केल 2:6 · मराठी बायबल
यहेज्केल 2:6 · मराठी बायबल

“मानवपुत्रा, त्या लोकांना घाबरु नकोस. ते जे बोलतात, त्याला भिऊ नकोस. ते तुझ्या विरुद्ध जातील आणि तुला इजा करण्याचा प्रयत्न करतील, हे अगदी खरे आहे. ते काट्यांप्रमाणे आहेत. आपण विंचवामध्ये राहत आहोत असे तुला वाटेल पण त्याच्या बोलण्याने घाबरुन जाऊ नकोस. ते बंडखोर लोक आहेत पण त्यांना भिऊ नकोस.

Cross references

2 शमुवेल 23:6

पण दुष्ट माणसे काट्यांसारखी असतात. लोक काटा धरून ठेवत नाहीत, फेकून देतात.

2 राजे 1:15

तेव्हा परमेश्वराचा दूत एलीयाला म्हणाला, “या सरदारबरोबर. जा व त्याला भिऊ नकोस.”तेव्हा एलीया त्या सरदाराबरोबर राजा अहज्याला भेटायला गेला.

नीतिसूत्रे 30:13

काही लोक स्वत:ला फार चांगले समजतात. आपण दुसऱ्यांपेक्षा खूप चांगले आहोत असे त्यांना वाटते.

यशया 9:18

कुकर्म हे ठिणगीसारखे असते. प्रथम, ते तण व काटेकुटे जाळते. नंतर रानातील झाडेझुडपे पेट घेतात आणि शेवटी त्याचा वणवा होऊन सगळेच त्याचे भक्ष्य होते.

यशया 51:7

ज्यांना चांगुलपणा म्हणजे काय ते कळते त्यांनी माझे ऐकावे. माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागणाऱ्यांनी मी काय सांगतो ते ऐकावे. दुष्टांना घाबरू नका. त्यांनी तुमची निंदा केली तरी भिऊ नका.

यशया 51:12

परमेश्वर म्हणतो, “मीच तो एकमेव ज्याने तुमचे दु:ख हलके केले. मग तुम्ही लोकांना का भ्यावे? ती जन्म मृत्यु पावणारी माणसेच आहेत. ते फक्त मनुष्यप्राणी आहेत. ते गवताप्रमाणे मरतात.”

यिर्मया 1:8

कोणालाही घाबरु नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझे रक्षण करीन.” हा परमेश्वराचा संदेश होता.

यिर्मया 1:17

“यास्तव, यिर्मया, तयार हो, उभा राहा आणि लोकांशी बोल. मी तुला सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू त्यांना सांग. लोकांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास, तर तू त्यांना घाबरावेस म्हणून मी सबळ कारण काढीन.

यिर्मया 6:28

माझे लोक माझ्याविरुद्ध गेले आहेत आणि ते दुराग्रही आहेत. ते लोकांबद्दल खोट्या गोष्टी बोलतात. ते सर्व दुष्ट आहेत. ते गंजलेल्या व कलंकित झालेल्या जस्त वा लोखंडाप्रमाणे आहेत.

यिर्मया 18:18

नंतर यिर्मयाचे शत्रू म्हणाले, “या आपण यिर्मयाविरुध्द कट करु या. नियमांची शिकवण याजकंाकडून नक्कीच विसरली जाणार नाही. सुज्ञांचा सल्ला अजूनही आमच्याजवळ असेल. आमच्यापाशी संदेष्ट्याचे शब्द असतील. म्हणून त्याच्याबद्दल खोटे सांगू या. त्यामुळे त्याचा नाश होईल. तो सांगत असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचे नाही.”

यहेज्केल 3:8

“पण मी तुला त्यांच्याप्रमाणेच कठोर बनवीन. तुला त्यांच्याप्रमाणे निष्ठुर बनवीन.

यहेज्केल 3:9

हिरा गारगोटीच्या दगडापेक्षा कठीण असतो. त्याचप्रमाणे तू त्यांच्यापेक्षा कठोर होशील. तू जास्त हट्टी होशील, म्हणजे तू त्या लोकांना घाबरणार नाहीस. माझ्या विरुध्द नेहमी जाणाऱ्या लोकांना तू घाबरणार नाहिस.”

यहेज्केल 3:26

मी तुझी जीभ टाळ्याला चिकटवीन. मग तुला बोलता येणार नाही. मग त्या लोकांना ते चुकीचे वागत आहेत हे सांगायला कोणीही नसेल. का? कारण ते नेहमीच माझ्याविरुद्व जातात.

यहेज्केल 28:24

“इस्राएलच्या सभोवतालच्या देशांनी इस्राएलचा तिरस्कार केला. पण त्यांचे वाईट होईल. मग इस्राएलच्या लोकांना बोचणारे तीक्ष्ण सुरे वा काटेरी झुडुपे उरणार नाहीत, व त्यांना समजून येईल की मीच परमेश्वर, त्यांचा प्रभू आहे.”

आमोस 7:10

बेथेल येथील एक याजक अमस्या ह्याने, “इस्राएलचा राजा यराबाम ह्याला पुढील निरोप पाठविला. आमोस तुझ्याविरुध्द उठाव करावा म्हणून प्रयत्न करीत आहे. तो इतका बोलतोय की हा देश त्याचे सर्व शब्द मानू शकत नाही.

मीखा 3:8

पण परमेश्वराच्या आत्म्याने मला अधिकार, चांगुलपणा व सामर्थ्याने भरुन टाकले आहे. मी याकोबला त्याच्या पापांबद्दल सांगीत. हो! मी इस्राएलशी त्याच्या पापांविषयी बोलेन.”

मीखा 7:4

त्यांच्यातील अतिशय चांगलाही काटेरी झुडुपाप्रमाणे आहे. ते गुंत्तागुंत असलेल्या कोटेरी झुडुपापेक्षा वाकडा (कपटी) आहे.हा दिवस येईल असे तुमच्या संदेष्ट्यांनी सांगितले होते. तो तुमच्या पहारेकऱ्यांनी सांगितलेला दिवस आला आहे. आता तुम्हाला शिक्षा होईल. तुमचा गोधंळ उडेल.

मत्तय 10:28

जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्याला भ्या.

लूक 10:19

ऐका मी तुम्हांला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा अधिकार दिला आहे. व मी तुम्हांला शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे. आणि कशानेच तुम्हांला अपाय होणार नाही.

लूक 11:12

किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्याला विंचू देईल?

लूक 12:4

“परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नये, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 4:13

यहूदी लोकांना समजले की, पेत्र व योहान यांचे खास प्रशिक्षण किंवा शिक्षण झालेले नाही. पण पुढाऱ्यांनी हे सुद्धा पाहिले की, पेत्र व योहान बोलायला घाबरत नव्हते. म्हणून पुढारी आश्चर्यचकित झाले. मग त्यांना उमगले की, पेत्र व योहान येशूबरोबर होते.

प्रेषितांचीं कृत्यें 4:19

पण पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला कोणते बरोबर वाटते? देव काय इच्छितो? आम्ही तुमची की देवाची आज्ञा पाळायची?

प्रेषितांचीं कृत्यें 4:29

आणि आता प्रभु, ते काय म्हणत आहेत ते ऐक. ते आम्हांला भेडसावण्याचा प्रयत्न करीन आहेत! प्रभु, आम्ही तुझे सेवक आहोत, तुला आम्ही जे बोलावे असे वाटते ते न भीता बोलण्यासाठी आम्हांला मदत कर.

इफिसकरांस 6:19

आणि माझ्यासाठी प्रार्थना करीत राहा. कारण जेव्हा मी तोंड उघडेन तेव्हा मला संदेश प्राप्त व्हावा. यासाठी की धैर्याने मला सुवार्तेचे रहस्य माहीत करुन देणे शक्य व्हावे.

फिलिप्पैकरांस 1:28

आणि जे तुम्हांला विरोध करतात त्यांना तुम्ही भ्याला नाहीत. तुमचे हे धैर्य त्याच्या नाशाचा पुरावा होईल. पण तुमच्या तारणाचा पुरावा होईल. आणि हे देवाकडून असेल.

2 तीमथ्थाला 1:7

कारण देवाने आम्हांला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. तर तो सावधानतेचा व सामर्थ्याची स्फूर्ति देणारा आतमा दिला आहे.

इब्री लोकांस 11:27

राजाच्या रागाची भिति व बाळगता, मोशेने इजिप्त देश सोडला. जणू काय न दिसणाऱ्या देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.

1 पेत्र 3:14

जे योग्य ते करुनसुद्धा जर तुम्हांला दु:ख सहन करावे लागते, तर तुम्ही धन्य आहात. म्हणून “त्या लोकांची भीति बाळगू नका किंवा गर्भगळित होऊ नका”

प्रकटीकरण 9:3

मग धुरातून टोळधाड पृथ्वीवर आली. त्यांनापृथ्वीवरील विंचवासारखा दंश करण्याचा अधिकार दिला होता.

Interlinear

Choose Theme