Home Bibles प्रकटीकरण 9:3 · मराठी बायबल
प्रकटीकरण 9:3 · मराठी बायबल

मग धुरातून टोळधाड पृथ्वीवर आली. त्यांनापृथ्वीवरील विंचवासारखा दंश करण्याचा अधिकार दिला होता.

Cross references

निर्गम 10:4

जर तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारशील तर उद्या मी तुझ्या देशावर टोळ धाड आणिन.

अनुवाद 8:15

विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हाला आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले.

शास्ते 7:12

मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील सर्व लोक त्या खोऱ्यात होते. त्यांचा जमाव टोळ धाडीसारखा दिसत होता. किनाऱ्यावरील वाळुकणांइतके असंख्य उंट त्यांच्याबरोबर होते.

1 राजे 12:11

माझ्या वडीलांनी तुम्हाला कामाला जुंपले. मी ते काम आणखी वाढवीन. त्यांनी तुम्हाला चाबकाचे फटकारे मारले असतील तर मी असा झोडपीन की विंचू डसल्यासारखे तुम्हाला वाटेल.”‘

2 इतिहास 10:11

माझ्या वडीलांनी तुमच्यावर फार ओझे लादले ना! मी तर ते अधिकच भारी करणार आहे. माझ्या वडलांनी तुम्हाला चाबकांचे फटकारे मारले. मी त्या चाबकांना धातूची अणकुचीदार टोके लावून शासन करीन.”

यशया 33:4

तुम्ही लोकांनी युध्दात वस्तू चोरल्या. त्या तुमच्याकडून परत घेतल्या जातील. खूप लोक येतील आणि तुमची संपत्ती लुटतील. टोळधाड ज्याप्रमाणे सर्व पीक फस्त करते तसे हे होईल.

यहेज्केल 2:6

“मानवपुत्रा, त्या लोकांना घाबरु नकोस. ते जे बोलतात, त्याला भिऊ नकोस. ते तुझ्या विरुद्ध जातील आणि तुला इजा करण्याचा प्रयत्न करतील, हे अगदी खरे आहे. ते काट्यांप्रमाणे आहेत. आपण विंचवामध्ये राहत आहोत असे तुला वाटेल पण त्याच्या बोलण्याने घाबरुन जाऊ नकोस. ते बंडखोर लोक आहेत पण त्यांना भिऊ नकोस.

योएल 1:4

जे नाकतोड्याने खाल्ले व जे कुसरूडाने सोडले, ते घुल्याने खाल्ले.

योएल 2:25

“मी, परमेश्वराने, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठविले. तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले.पण, मी, परमेश्वर, तुमच्या संकटांच्या वर्षाची भरपाई करीन.

नहूम 3:15

तू हे सर्व करु शकशील, पण आग तुझा संपूर्ण नाश करील, तलवार तुला कापून काढील. तुझा देश, येऊन सर्व फस्त करणार्या टोळधाडीप्रमाणे दिसेल.निनवे, तुझा विस्तार वाढत राहिला. तू टोळधाडीप्रमाणे झालीस. तू कुसरुडांच्या थव्याप्रमाणे झालीस.

नहूम 3:17

तुझे सरकारी अधिकारीही असेच आहेत. टोळ थंड वेळी दगडी भिंतीवर बसतात. पण ऊन तापताच भिंत गरम होते, तेव्हा ते डडून जातात व कोठे जातात, ते कोणालाच माहीत नसते. तुझे अधिकारी अगदी असेच असतील.

लूक 10:19

ऐका मी तुम्हांला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा अधिकार दिला आहे. व मी तुम्हांला शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे. आणि कशानेच तुम्हांला अपाय होणार नाही.

प्रकटीकरण 9:5

या टोळांना लोकांना वेदना देण्यासाठी पाच महिने वेळ दिला होता. अधिकार दिला होता. पणत्यांना लोकांना ठार मारण्याचा अधिकार देण्यात आला नव्हता. त्यांच्या दंशाने ज्या वेदना होत त्या वेदना विंचवाने डंखमारल्यावर होतात तशा होत होत्या.

प्रकटीकरण 9:10

त्यांना विंचवासारख्या शेपट्या व नांग्या होत्या. लोकांना पाच महिनेवेदना देण्याची त्यांच्या शेपटीत ताकद होती.

Interlinear

Choose Theme