Home Bibles यिर्मया 1:8 · मराठी बायबल
यिर्मया 1:8 · मराठी बायबल

कोणालाही घाबरु नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझे रक्षण करीन.” हा परमेश्वराचा संदेश होता.

Cross references

निर्गम 3:12

देव म्हणाला, “हे तू करु शकशील, कारण मी तुजबरोबर असेन मी तुला पाठवीत आहे याचा पुरावा असा असेल; तू इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर आणल्यावर या डोंगरावर येऊन माझी उपासना करशील.”

अनुवाद 31:6

शौर्य दाखवा. खंबीर पणाने वागा. त्या लोकांची भीती बाळगू नका! कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही”

अनुवाद 31:8

परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हाला सोडून जाणार नाही, तुम्हाला अंतर देणार नाही. तेव्हा खचून जाऊ नका आणि निर्भय व्हा.”

यहोशवा 1:5

मोशेला दिली तशीच तुलाही मी साथ देईन. तुला आता कोणी तुझे आयुष्य असेपर्यंत अटकाव करू शकणार नाही. मी तुला सोडणार नाही, तुला अंतर देणार नाही.

यहोशवा 1:9

खंबीर आणि निर्भय राहण्याची मी तुला आज्ञा केली आहे ना? तेव्हा कचरू नकोस. परमेश्वर तू जेथे जाशील तेथे तुझ्या बरोबर आहे.”

यशया 43:2

जेव्हा तू अडचणीत असतोस, तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो. जेव्हा तू नद्या ओलांडशील तेव्हा इजा होणार नाही. आगीमधून चालताना तुला भाजणार नाही. ज्वाळा तुला पोळणार नाहीत.

यशया 51:7

ज्यांना चांगुलपणा म्हणजे काय ते कळते त्यांनी माझे ऐकावे. माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागणाऱ्यांनी मी काय सांगतो ते ऐकावे. दुष्टांना घाबरू नका. त्यांनी तुमची निंदा केली तरी भिऊ नका.

यशया 51:12

परमेश्वर म्हणतो, “मीच तो एकमेव ज्याने तुमचे दु:ख हलके केले. मग तुम्ही लोकांना का भ्यावे? ती जन्म मृत्यु पावणारी माणसेच आहेत. ते फक्त मनुष्यप्राणी आहेत. ते गवताप्रमाणे मरतात.”

यिर्मया 1:17

“यास्तव, यिर्मया, तयार हो, उभा राहा आणि लोकांशी बोल. मी तुला सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू त्यांना सांग. लोकांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास, तर तू त्यांना घाबरावेस म्हणून मी सबळ कारण काढीन.

यिर्मया 15:20

त्या लोकांना तू काश्याची भिंत वाटशील, एवढा मी तुला बलवान करीन. ते तुझ्याविरुद्ध लढतील, पण ते तुझा पराभव करु शकणार नाहीत. का? कारण मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला मदत करीन आणि तुझे रक्षण करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

यिर्मया 20:11

पण परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. परमेश्वर बलवान सैनिकाप्रमाणे आहे. म्हणून माझा पाठलाग करणारे पडतील. ते माझा पराभव करु शकणार नाहीत. ते पडतील, त्यांची निराश होईल. त्यांची नामुष्की होईल आणि ही त्यांची नामुष्की इतर लोक कधीही विसरणार नाहीत.

यहेज्केल 2:6

“मानवपुत्रा, त्या लोकांना घाबरु नकोस. ते जे बोलतात, त्याला भिऊ नकोस. ते तुझ्या विरुद्ध जातील आणि तुला इजा करण्याचा प्रयत्न करतील, हे अगदी खरे आहे. ते काट्यांप्रमाणे आहेत. आपण विंचवामध्ये राहत आहोत असे तुला वाटेल पण त्याच्या बोलण्याने घाबरुन जाऊ नकोस. ते बंडखोर लोक आहेत पण त्यांना भिऊ नकोस.

यहेज्केल 3:8

“पण मी तुला त्यांच्याप्रमाणेच कठोर बनवीन. तुला त्यांच्याप्रमाणे निष्ठुर बनवीन.

मत्तय 10:26

“म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही.

मत्तय 28:20

आणि जे काही मी तुम्हांला शिकविले आहे ते त्या लोकांना करायला शिकवा. आणि पाहा, काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर राहीन.ʈ

लूक 12:4

“परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नये, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 4:13

यहूदी लोकांना समजले की, पेत्र व योहान यांचे खास प्रशिक्षण किंवा शिक्षण झालेले नाही. पण पुढाऱ्यांनी हे सुद्धा पाहिले की, पेत्र व योहान बोलायला घाबरत नव्हते. म्हणून पुढारी आश्चर्यचकित झाले. मग त्यांना उमगले की, पेत्र व योहान येशूबरोबर होते.

प्रेषितांचीं कृत्यें 4:29

आणि आता प्रभु, ते काय म्हणत आहेत ते ऐक. ते आम्हांला भेडसावण्याचा प्रयत्न करीन आहेत! प्रभु, आम्ही तुझे सेवक आहोत, तुला आम्ही जे बोलावे असे वाटते ते न भीता बोलण्यासाठी आम्हांला मदत कर.

प्रेषितांचीं कृत्यें 7:9

“या वडिलांना (पूर्वजांना) योसेफाचा मत्सर वाटला. त्यांनी योसेफाला इजिप्तमध्ये एक गुलाम म्हणून विकले, परंतु योसेफाबरोबर देव होता.

प्रेषितांचीं कृत्यें 18:10

मी तुझ्याबरोबर आहे. कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत.”

प्रेषितांचीं कृत्यें 26:17

मी तुझी यहूदी व यहूदीतर विदेशी यांच्यापासून सुटका करीन. आणि यहूदीतर विदेशी लोकांकडे पाठवीन.

2 करिंथकरांस 1:8

बंधूंनो, आशिया प्रांतात जो त्रास आम्ही सहन केला त्याविषयी तुम्ही अंधारात असावे अशी आमची इच्छा नाही. आम्हांला तेथे मोठे ओझे होते. आमच्या शक्तिपलीकडचे ते ओझे होते. आम्ही जीवनाविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती.

इफिसकरांस 6:20

त्याच्या वतीने मी साखळदंडनी बांधलेला राजदूत म्हणून सेवा करीत आहे. धैर्याने मला ती सांगता यावी म्हणून प्रार्थना करा.

2 तीमथ्थाला 4:17

प्रभु माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व विदेश्यांनी ती ऐकावी. सिंहाच्या मुखातून त्याने मला सोडविले.

इब्री लोकांस 13:5

आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना. कारण देवाने असे म्हटले आहे.“मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही” अनुवाद 31:6

Interlinear

Choose Theme