Home Bibles नीतिसूत्रे 30:13 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 30:13 · मराठी बायबल

काही लोक स्वत:ला फार चांगले समजतात. आपण दुसऱ्यांपेक्षा खूप चांगले आहोत असे त्यांना वाटते.

Cross references

स्तोत्रसंहिता 101:5

जर एखादा माणूस त्याच्या शेजाऱ्याबद्दल गुप्तपणेवाईट गोष्टी बोलत असेल तर मी त्या माणसाला थांबवेन. मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही आणि ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही.

स्तोत्रसंहिता 131:1

परमेश्वरा, मी गर्विष्ठ नाही. मी कुणीतरी मोठा आहे असे मी वागत नाही. मी खूप भव्य असे काही करायचा प्रयत्न करत नाही. मी माझ्या आवाक्या बाहेरच्या गोष्टींची चिंता कधीच करत नाही.

नीतिसूत्रे 6:17

डोळे, जे माणूस गर्विष्ठ आहे हे दाखवतात. जीभ, जी खोटे बोलते, हात, जे निरपराध्यांना ठार मारतात.

नीतिसूत्रे 21:4

गर्विष्ठ दृष्टी व गर्विष्ठ विचार पापरुप आहेत. माणूस पातकी आहे हेच ते दर्शवितात.

यशया 2:11

गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल आणि ते शरमिंदे होऊन माना खाली घालतील. अशा वेळी फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा असेल.

यशया 3:16

परमेश्वर म्हणतो, “सीयोनमधल्या स्त्रिया फार गर्विष्ठ झाल्या आहेत. आपण इतर लोकांपेक्षा उच्च आहोत हे दाखवीत त्या ताठ मानेने वावरत असतात. त्या डोळे मारीत, आपल्या पैंजणांचा आवाज करीत ठुमकत चालतात.”

यहेज्केल 28:2

“मानवपुत्रा, ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो,’ असे सोरच्या राजाला सांग:“तू फार गर्विष्ठ आहेस. तू म्हणतोस “मी देव आहे. समुद्राच्या मध्यभागी मी देवाच्या आसनावर बसतो.”“पण तू मानव आहेस, देव नाही. तुला आपण देव आहोत असे फक्त वाटते.

यहेज्केल 28:9

माणूस तुला ठार मारेल. तरी तू त्याला “मी देव आहे.” असे म्हणशील का? नाही तो तुला ताब्यात घेईल. मग तुला समजेल की तू मानव आहेस, देव नव्हे!

दानीएल 11:36

उत्तरेचा राजा त्याला पाहिजे ते करील. तो स्वत:बद्दल बढाया मारील. तो स्वत: करील. व स्वत:ला देवापेक्षा सुध्दा चांगले समजेल कोणीही ऐकल्या नसतील अशा गोष्टी तो सांगेल. देवांच्या देवाविरुध्द तो अशा गोष्टी सांगेल.सर्व वाईट घडेपर्यंत त्याला यश मिळेल.देवाने घडविण्याचे ठराविलेले घडेलच.

हबक्कूक 2:4

जे लोक हा संदेश ऐकण्याचे नाकारतील, त्यांना त्याचा फायदा होऊ शकणार नाही. पण सज्जन माणूस ह्या संदेशावर विश्वास ठेवील. आणि तो त्याच्या श्रध्देमुळे जगे”

2 थेस्सलनीकाकरांस 2:3

तर कोणीही तुम्हाला कोणत्याही प्रकारे फसवू नये. म्हणून सावध असा. मी असे म्हणतो कारण पहिल्यांदा मोठी बंडखोरी झाल्याशिवाय प्रभूचा दिवस येणार नाही. आणि जो नाशासाठी नेमला आहे, तो नियम मोडणारा प्रकट होईल.

Interlinear

Choose Theme