Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 27:29 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 27:29 · मराठी बायबल

ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीति वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची वाट पाहू लागले.

Cross references

अनुवाद 28:67

सकाळी तुम्ही म्हणाल, ‘ही रात्र असती तर बरे! आणि रात्री म्हणाल, ‘ही सकाळ असती तर किती बरे!’ तुमच्या मनातील भीती आणि डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी यामुळे असे होईल.

स्तोत्रसंहिता 130:6

मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे. मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 27:17

जीवन रक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले. जहाज वाळू असलेल्या सूर्तीनावाच्या उथळ जागी आदळेल या भीतीने त्यांनी शीड खाली काढले. तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:26

परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरुन थांबावे लागले.”

प्रेषितांचीं कृत्यें 27:30

खलाशांनी जहाजातून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवनरक्षक होड्या समुद्रात टाकल्या.

प्रेषितांचीं कृत्यें 27:40

म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले. त्याचबरोबर सुकाणूंच्या दोऱ्या एकत्र केल्या. नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीङ वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले.

इब्री लोकांस 6:19

आम्हांला ही आशा जणू काय भक्क म, सुरक्षित अशा नांगरासारखी आत्म्याला आहे व ही आशा मंदिराच्या पडद्यामागील आतील बाजूस प्रवेश करते,

Interlinear

Choose Theme