Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 21:16 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 21:16 · मराठी बायबल

कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हांला म्लासोनकडे घेऊन गेले.कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो. तो (म्नासोन) कुप्रचा होता. तो सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता.

Cross references

स्तोत्रसंहिता 71:17

देवा, तू मला मी लहान मुलगा होतो तेव्हापासून शिकवीत आहेस आणि आजच्या दिवसापर्यंत मी लोकांना तू करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगितले.

स्तोत्रसंहिता 92:14

ते जुने झाल्यावरही फळे देत राहातील. ते सशक्त हिरव्या झाडासारखे असतील.

नीतिसूत्रे 16:31

जी माणसे चांगले आयुष्य जगली त्यांचे पांढरे केस म्हणजे वैभवाचा मुकुट आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 8:40

आपण अजोत नगरात आहोत असे फिलिप्पाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली. नंतर तो कैसरीयाला गेला.

प्रेषितांचीं कृत्यें 10:24

दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरीया शहरात आला. कर्नेल्य त्याची वाट पाहत होता. त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते.

प्रेषितांचीं कृत्यें 10:48

म्हणून पेत्राने कर्नेल्य, त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली. मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्याबरोबर राहावे अशी त्या लोकांनी त्याला विनंति केली.

प्रेषितांचीं कृत्यें 11:19

स्तेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला, त्यामुळे विश्वासणारे पांगले. यतील काही दूरच्या ठिकाणी, उदा. फेनीके, कुप्र व अंत्युखियापर्यंत गेले. विश्वासणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहूदी लोकांनाच सुवार्ता सांगितली.

प्रेषितांचीं कृत्यें 15:39

पौल आणि बर्णबा यांच्यात यावरुन मोठा वाद झाला. ते विभक्त झाले व वेगळ्या मार्गांनी गेले. बर्णबा योहानासह कुप्र येथे समुद्रमार्गे गेला.

प्रेषितांचीं कृत्यें 21:3

तेव्हा कुप्र आमच्या नजरेत आले. परंतु ते डाव्या अंगाला टाकून आम्ही थेट सूरीया देशाला रवाना झालो व सोर येथे उतरलो. कारण तेथे जहाजातील माल उतरावययाचा होता.

प्रेषितांचीं कृत्यें 21:8

आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरीयास आलो व सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो. तो निवडलेल्या सात सेवकांपैकीएक होता.

रोमकरांस 16:7

अंद्रोनीक आणि युनिया, माझे नातेवाईक आणि सहबंदिवान जे प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व ख्रिस्तात माझ्यापूर्वी होते त्यांना सलाम सांगा.

फिलेमोना 1:9

प्रेमामुळे मी तुला आवाहन करणे पसंत करतो. मी पौल, एक वृद्ध मनुष्य म्हणून जसा आहे तसा स्वत:ला सादर करतो आणि आता ख्रिस्त येशूमधील कैदीसुद्धा असलेला असा,

1 योहान 2:13

वडिलांनो, मी तुम्हांला लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मीतुम्हांला लिहीत आहे, कारण दुष्टावर तुम्ही जय मिळविला आहे.

Interlinear

Choose Theme