Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 8:40 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 8:40 · मराठी बायबल

आपण अजोत नगरात आहोत असे फिलिप्पाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली. नंतर तो कैसरीयाला गेला.

Cross references

1 शमुवेल 5:1

पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश घेतला. तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला.

जखऱ्या 9:6

अश्दोदच्या लोकांना आपले खरे जन्मदाते कोण ह्याचा पत्ता लागणार नाही. गर्विष्ठ पलिष्ट्यांचा मी पूर्णपणे नाश करीन.

लूक 10:1

या घटनांनंतर प्रभुने इतर बहात्तर जणांचीनेमणूक केली. आणि येशूने त्यांना जोडीजोडीने पाठविले. त्याला ज्या ठिकाणी जायचे होते त्या प्रत्येक गावात व ठिकाणी त्याने त्यांना पाठविले.

प्रेषितांचीं कृत्यें 8:25

नंतर दोन्ही प्रेषितांनी आपली साक्ष लोकांना दिली (जे त्यांनी येशूला करताना पाहिले होते ते सांगितले.) त्यांनी प्रभुचा संदेश त्यांना सांगितला. मग ते यरुशलेमला परत गेले. परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावांत सुवार्ता सांगितली.

प्रेषितांचीं कृत्यें 10:1

कर्नेल्य नावाचा मनुष्य कैसरीयामध्ये राहत होता. तो इटलीक नावाच्या पलटणीन शताधिपती होता.

प्रेषितांचीं कृत्यें 10:24

दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरीया शहरात आला. कर्नेल्य त्याची वाट पाहत होता. त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते.

प्रेषितांचीं कृत्यें 12:19

हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले पण तो त्याला शोधू शकला नाही. मग हेरोदाने पहारेकऱ्यांना प्रश्न विचारले व त्यांना मरणाची शिक्षा ठोठावली.नंतर हेरोद यहूदातून निघून गेला. तो कैसरीया शहरात गेला व तेथे काही काळ राहिला.

प्रेषितांचीं कृत्यें 21:8

आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरीयास आलो व सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो. तो निवडलेल्या सात सेवकांपैकीएक होता.

प्रेषितांचीं कृत्यें 21:16

कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हांला म्लासोनकडे घेऊन गेले.कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो. तो (म्नासोन) कुप्रचा होता. तो सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता.

प्रेषितांचीं कृत्यें 23:23

मग सरदाराने दोघा शाताधिपतींना बोलाविले, आणि म्हणाला, “दोनशे शिपाई कैसरीयाला जाण्यासाठी तयार ठेवा. तसेच सत्तर घोडेस्वार व दोनशे भालेदार रात्री नऊ वाजता येथून जाण्यासाठी तयार ठेवा!

प्रेषितांचीं कृत्यें 23:33

जेव्हा पौल व घोडेस्वार कैसरियास पोहोंचले, तेव्हा त्यांनी राज्यपालाला पत्र दिले. व पौलाला त्याच्या स्वाधीन केले.

प्रेषितांचीं कृत्यें 25:1

मग त्या प्रांतात फेस्त आला. आणि तीन दिवसांनी तो कैसरीयाहून वर यरुशलेमला गेला.

प्रेषितांचीं कृत्यें 25:4

फेस्तने उत्तर दिले, “पौल कैसरीया येथे बंदिवासात आहे आणि मी स्वत: लवकरच कैसरीयाला जाणार आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 25:6

त्यांच्याबरोबर आठ ते दहा दिवस घालविल्यानंतर फेस्त खाली कैसरीयाला परत गेला. दुसऱ्या दिवशी फेस्त न्यायालयात बसला आणि त्याने आपल्यासमोर पौलाला हजर करण्याचा आदेश दिला.

प्रेषितांचीं कृत्यें 25:13

काही दिवसांनंतर फेस्ताचे स्वागत करण्याच्या हेतूने राजा अग्रिप्पाआणि बर्णीकाकैसरीयाला येऊन त्याला भेटले.

रोमकरांस 15:19

अदभुते, चमत्काराच्या व देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने मी यरुशलेमेपासून इल्लूरिकमाच्या सभोवती ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याचे पूर्ण केले आहे.

Interlinear

Interlinear data is unavailable for this verse.

Choose Theme