मग रहबामने माकाशी विवाह केला. माका ही अबशालोमची नात. माकाला रहबामपासून अबीया, अत्थय, जीजा आणि शलोमीथ ही मुले झाली.
Cross references
नबाटाचा मुलगा यराबाम इस्राएलवर राज्य करत होता. त्याच्या राजेपणाच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष चालू असताना, त्याचा (रहबामचा) मुलगा अबीया यहूदाचा पुढचा राजा झाला.
अबीयाने तीन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव माका ही अबीशालोमची मुलगी.
रहबामचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमची नात. रहबामला अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी होत्या. त्याला अठ्ठावीस मुलगे आणि साठ मुली होत्या.
रहबामने मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांबरोबर विश्रांती घेतली. दावीदनगरात त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा अबीया गादीवर आला.
इस्राएलचा राजा यराबामच्या कारकीर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदाचा राजा झाला.
त्याने यरुशलेममध्ये तीन वर्षे राज्य केले. मीखाया ही अबीयाच्री आई. गिबा नगरातील उरीएलची ती मुलगी. अबीया आणि यराबाम यांच्यामध्ये लढाई जुंपली.
शलमोन रहबामचा पिता होता. रहबाम अबीयाचा पिता होता. अबीया आसाचा पिता होता.