Home Bibles 2 इतिहास 13:2 · मराठी बायबल
2 इतिहास 13:2 · मराठी बायबल

त्याने यरुशलेममध्ये तीन वर्षे राज्य केले. मीखाया ही अबीयाच्री आई. गिबा नगरातील उरीएलची ती मुलगी. अबीया आणि यराबाम यांच्यामध्ये लढाई जुंपली.

Cross references

यहोशवा 18:28

सेला, ऐलेक, यबूसी (म्हणजेच यरूशलेम गिबाथ आणि किर्याथ ही चौदा नगरे आणि आसपासची गावे सुध्दा बन्यामीनाच्या वंशजांना मिळाली.

शास्ते 19:14

आणि ते सगळे पुढे निघाले. गिबात शिरताशिरताच सूर्यास्त होत होता. गिबा हा प्रदेश बन्यामीनच्या हद्दीत येत होता.

शास्ते 19:16

एक म्हातारा माणूस तेव्हा शेतावरुन शहराकडे परतत होता. एफ्राइमच्या डोंगराळ भागात त्याचे घर होते. पण सध्या तो गिबा येथे राहात होता. (गिबा मधील लोक बन्यामीनच्या वंशातील होते.)

1 शमुवेल 10:26

शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. शूर सैनिकांना परमेश्वराकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी शौलचे अनुयायित्व पत्करले.

1 राजे 14:19

राजा यराबामने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे.

1 राजे 14:20

बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा नादाब त्याच्यानंतर सत्तेवर आला.

1 राजे 15:2

अबीयाने तीन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव माका ही अबीशालोमची मुलगी.

1 राजे 15:6

रहबाम आणि यराबाम नेहमीच एकमेकांविरुध्द लढत असत.

2 इतिहास 11:20

मग रहबामने माकाशी विवाह केला. माका ही अबशालोमची नात. माकाला रहबामपासून अबीया, अत्थय, जीजा आणि शलोमीथ ही मुले झाली.

2 इतिहास 12:15

शमाया हा संदेष्टा आणि इद्दो हा द्रष्टा यांच्या इतिहासात रहबामने आपल्या कारकीर्दीत केलेल्या सर्व गोष्टींची साद्यंत हकीकत आहे. शमाया आणि इद्दो वंशाळींचा इतिहास लिहीत. रहबाम आणि यराबाम या दोघांमध्ये नित्य लढाया होत.

Interlinear

Choose Theme