Home Bibles 2 इतिहास 11:21 · मराठी बायबल
2 इतिहास 11:21 · मराठी बायबल

रहबामचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमची नात. रहबामला अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी होत्या. त्याला अठ्ठावीस मुलगे आणि साठ मुली होत्या.

Cross references

अनुवाद 17:17

तसेच त्याला बऱ्याच बायका असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये.

अनुवाद 21:16

अशा परिस्थितीत, आपल्या मालमत्तेची वाटणी करताना ज्येष्ठ मुलाच्या वाटणीचे, आवडतीच्या मुलाला देऊ नये.

शास्ते 8:30

त्याला सत्तर मुलगे होते. कारण त्याला अनेक बायका होत्या.

2 शमुवेल 3:2

हेब्रोन येथे दावीदाला मुलगे झाले, त्यांचा क्रम असा इज्रेलची अहीनवाम हिच्यापासून पाहिला मुलगा झाला तो अम्मोन.

2 शमुवेल 5:13

हेब्रोनहून आता दावीद यरुशलेम येथे आला. तेथे त्याने आणखी लग्ने केली आणि त्याच्याकडे आता अधिक दासी आणि बायका होत्या. यरुशलेम येथे त्याच्या आणखी काही मुलांचा जन्म झाला.

1 राजे 11:3

त्याला सातशे बायका होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्याला आणखी तीनशे दासीही होत्या. ह्या बायकांनी त्याला देवापासून दूर जाण्यास भाग पाडले.

1 इतिहास 3:1

दावीदाच्या काही मुलांचा जन्म हेब्रोन नगरात झाला. त्यांची यादी अशी: अम्रोन हा त्यातला थोरला. इज्रेल नगरातील अहीनवाम ही त्याची आई.दानीएल हा दुसरा. कर्मेल यहूदा येथील अबीगईल ही त्याची आई.

2 इतिहास 11:23

रहबामने मोठ्या चतुराईने आपल्या सर्व मुलांना यहूदा आणि बन्यामिनमधील नगरांमध्ये विखरुन ठेवले. त्यांना उत्तम रसद पुरवली. त्यांची लगे लावून दिली.

गीतरत्न 6:8

तिथे कदचित 60 राण्या आणि 80 दासीअसतील आणि तरुण स्त्रिया अगणित असतील.

Interlinear

Choose Theme