Cross references
मंदिराला अरुंद खिडक्या होत्या त्या बाहेरच्या बाजूने अरुंद आणि आतल्या बाजूने रुंद होत्या.
दोन्ही टोकांना तीन तीन दरवाजे होते. दाराची कवाडे आणि चौकटी काटकोन चौकोनात होत्या.
वेशीच्या भिंतीवरील दगड माणकांचे बसवीन. वेशीच्या दारासाठी मी चकाकणारी रत्ने वापरीन. वेशीसाठी मी हिरेमाणके वापरीन.
चौकीदाराच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप ह्यांच्यावर लहान लहान खिडक्या होत्या. खिडक्यांचा रुद भाग प्रवेशद्वाराकडे होता. प्रवेशद्वारच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर खजुराची झाडे कोरलेली होती.
पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वाराच्या खिडक्यांच्या, द्वारमंडपाच्या मापाच्याच ह्या द्वाराच्या खिडक्या व द्वारमंडप होता. खजुरीच्या झाडांचे नक्षीकामही अगदी तसेच होते. द्वाराला सात पायऱ्या होत्या व द्वारमंडप आतल्या बाजूला होता.
दार, त्याचा द्वारमंडप ह्यांना इतर दारांप्रमाणेच खिडक्या होत्या. दार 50 हात लांब व 25हात रुंद होते.
दक्षिणेकडच्या दाराजवळच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच होते. दाराच्या व द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43फूट 9 इंच) रुंद होते. त्यांच्या सर्व बाजूंनी द्वारमंडप होते.
पूर्वेच्या दाराकडील खोल्या बाजूच्या भिंती व द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच त्यांच्याच मापाचे होते. दाराच्या व द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. पूर्वेकडील दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43फूट 9 इंच) रुंद होते.
त्याच्या खोल्या, बाजूच्या भिंती, व द्वारमंडप हे इतर दारांच्या खोल्या, बाजूच्या भिंती व द्वारमंडप ह्यांच्याच मापाचे होते. ते दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43ूट 9 इंच) रुंद होते.
खिडक्यांभोवती चौकटी होत्या. आणि द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूच्या भिंती द्वारमंडपाचे छत आणि मंदिराच्या सभोवतालच्या खोल्या ह्यांच्यावर खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम केलेले होते.