दक्षिणेकडच्या दाराजवळच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच होते. दाराच्या व द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43फूट 9 इंच) रुंद होते. त्यांच्या सर्व बाजूंनी द्वारमंडप होते.
Cross references
भिंतींवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या तीन ओळी होत्या.
दावीदाने मग मंदिराचा आराखडा, आपला मुलगा शलमोन याच्या स्वधीन केला. मंदिराभोवतालचे आवार, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचाही त्या आराखड्यात समावेश होता.
हिज्कीयाने मग याजकांना परमेश्वराच्या मंदिरात कोठारे तयार ठेवायला सांगितली. त्याची आज्ञा अंमलात आणली गेली.
त्या खोल्या शुध्द आणि स्वच्छ करून घ्यायची मी आज्ञा दिली. मग मंदिरातील पात्रे, वस्तू, धान्यार्पणे, धूप वगैरे मी पूर्ववत तिथे ठेवले.
“यिर्मया, रेखाब्यांकडे जा त्यांना देवाच्या मंदिरातील एका बाजूच्या खोलीत बोलाव. त्यांना पिण्यास मद्य दे.”
त्याच वेळी यिर्मयाच्या शब्दातील पट बारुखने वाचून दाखविला. त्याने तो परमेश्वराच्या मंदिरात वाचून दाखविला. हा पट वाचताना बारुख गमऱ्याच्या घरच्या चौकातील खोलीत होता. ही खोली मंदिराच्या ‘नवीन प्रवेशद्वारा’ जवळ होती. गमऱ्या शाफानचा मुलगा होता. गमऱ्या मंदिरातील लेखनिक होता.
चौकीदाराची खोली एक पट्टी (10 फूट 6 इंच) लांब व एक पट्टी (10 फूट 6 इंच) रुद होती. मंदिरासमोरच्या प्रवेशद्वारच्या द्वारमंडपाच्या दाराची रुंदी एक पट्टी होती.
दाराच्या प्रत्येक बाजूला तीन लहान खोल्या होत्या. त्या सारख्या मापाच्या होत्या. दोन्ही बाजूच्या दाराच्या बाजूच्या भिंती सारख्या मापाच्या होत्या.
प्रत्येक खोलीसमोर एक बुटकी भिंत होती. ती एक हात (1 फूट 6 इंच) उंच आणि 1 हात (1 फूट 6 इंच) जाड होती. खोल्यांची प्रत्येक बाजू 6 हात (10 फूट 6 इंच) लांब होती.
चौकीदाराच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप ह्यांच्यावर लहान लहान खिडक्या होत्या. खिडक्यांचा रुद भाग प्रवेशद्वाराकडे होता. प्रवेशद्वारच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर खजुराची झाडे कोरलेली होती.
हे द्वार त्याच्या प्रत्येक बाजूला असलेल्या तीन तीन खोल्या आणि त्याचा द्वारमंडप ह्यांची मापे पहिल्या प्रवेशद्वाराएवढीच होती. द्वार 50 हात लांब व 25हात रुंद होते.
दार, त्याचा द्वारमंडप ह्यांना इतर दारांप्रमाणेच खिडक्या होत्या. दार 50 हात लांब व 25हात रुंद होते.