Home Bibles तीताला 3:12 · मराठी बायबल
तीताला 3:12 · मराठी बायबल

जेव्हा मी अर्तमाला किंवा तुखिकाला तुझ्याकडे पाठवीन तेव्हा मला भेटण्यासाठी निकपलिसास येण्याचा तू होईल तितका प्रयत्न कर. कारण तेथे हिवाऴा घालविण्याचे मी ठरविले आहे.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 20:4

त्याच्याबरोबर काही लोक होते ते असे: बिरुया शहराच्या पुरर्ाचा मुलगा सोपत्र. थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकूंद, दर्बे येथील गायस आणि तीमथ्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते.

1 करिंथकरांस 16:6

परंतु कदाचित शक्यतो मी तुमच्याबरोबर काही काळ घालवीन किंवा हिवाळासुद्धा तुमच्यात घालवीन. यासाठी की मी जिकडे जाणार आहे तिकडे तुम्ही मला पाठवावे.

1 करिंथकरांस 16:8

पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिसात राहीन

2 तीमथ्थाला 4:9

तुला शक्य होईल तितक्या लवकर मला भेटावयाला येण्याचा प्रयत्न कर.

2 तीमथ्थाला 4:12

तुखिकाला मी इफिसास पाठविले आहे.

2 तीमथ्थाला 4:21

तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर. युबुल, पुदेश, लीन, वलौदिया व इतर सर्व बंधु तुला सलाम सांगतात.

Interlinear

Choose Theme