Home Bibles 2 तीमथ्थाला 4:21 · मराठी बायबल
2 तीमथ्थाला 4:21 · मराठी बायबल

तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर. युबुल, पुदेश, लीन, वलौदिया व इतर सर्व बंधु तुला सलाम सांगतात.

Cross references

रोमकरांस 16:21

माझा सहकारी तिमथ्य त्याचप्रमाणे माझे नातेवाईक लुक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला सलाम सांगतात.

1 करिंथकरांस 16:20

सर्व बंधु तुम्हांला सलाम सांगतात, पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा.

2 करिंथकरांस 13:13

सर्व संत आपणांस सलाम सांगतात.

फिलिप्पैकरांस 4:22

येथील सर्व संत विशेषेकरुन कैसराच्या घरातील संत तुम्हांला सलाम सांगतात.

2 तीमथ्थाला 1:4

माझ्यासाठी तू ढाळलेल्या अश्रूंची आठवण करताना तुला भेटण्याची आतुरतेने वाट पाहतो. यासाठी की मी आनंदाने भरूने जावे.

2 तीमथ्थाला 4:9

तुला शक्य होईल तितक्या लवकर मला भेटावयाला येण्याचा प्रयत्न कर.

2 तीमथ्थाला 4:13

त्रोवसात कार्पाच्या घरी राहिलेला माझा झगा येताना घेऊन ये. तसेच माझी पुस्तके, विशेषत: चर्मपत्राच्या गुंडाळ्या घेऊन ये.

2 योहान 1:13

देवाने निवडून घेतलेल्या तुमच्या बहिणीचीमुले तुम्हांला सलाम सांगतात.

3 योहान 1:14

त्याऐवजी,तुला लवकर भेटण्याची मला आशा आहे. मग आपल्याला समोरासमोर बोलता येईल. [15] तुझ्याबरोबर शांति असो. तुझे सर्वमित्र तुला सलाम सांगतात. तेथील सर्व मित्रांना नावाने आमचा सलाम सांग.

Interlinear

Choose Theme