Home Bibles प्रकटीकरण 11:7 · मराठी बायबल
प्रकटीकरण 11:7 · मराठी बायबल

आणि जेव्हा दोन साक्षीदार त्यांचा संदेश देण्याचे संपवतील तेव्हा त्या अभांग दऱ्यातून येणारा प्राणी त्यांच्याशी लढाईकरील. प्राणी त्यांचा पराभव करील व, त्यांना मारुन टाकील.

Cross references

दानीएल 7:21

“मी पाहत असतानाच, त्या लहान शिंगाने देवाच्या खास माणसांवर हल्ला करून लढण्यास सुरवात केली. ते शिंग लोकांना ठार करू लागले.

दानीएल 7:25

हा राजा परात्पर देवाच्या विरुद्ध बोलेल. तो देवाच्या खास माणसांना दुखवेल व ठार मारील. आधीचे कायदे या काळ बदलायचा तो प्रयत्न करील. देवाचे खास लोक एक वेळ, अनेक वेळा व अर्धा वेळ.त्याच्या सत्तेखाली राहातील.

दानीएल 8:23

“त्य़ा राज्यांचा शेवट जवळ आला असताना,एक उध्दट व क्रूर राजा होईल. तो फार लबाड असेल. पातकी लोकांची दृष्कृत्ये पूर्णतेला पोहोंचल्यावर हे घडेल

जखऱ्या 14:2

यरुशलेमशी लढण्यासाठी मी सर्व राष्ट्रांना एकत्र करीन. ते नगरी ताब्यात घेतील आणि घरांचा नाश करतील. स्त्रियांवर बलात्कार करतील व अर्धे - अधिक लोक कैद केले जातील. पण उरलेल्या लोकांना नगरीतून नेले जाणार नाही.

लूक 13:32

येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, “ऐक, मी लोकांतून भुते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’

योहान 17:4

तू मला जे काम करायला दिले ते संपवून मी पृथ्वीवर तुला गौरविले.

योहान 19:30

येशू आंब घेतल्यावर म्हणाला, “पूर्ण झाले आहे.” मग त्याने आपले डोके लववून आपला आत्मा सोडून दिला.

प्रेषितांचीं कृत्यें 20:24

मी माइया जीवनाविषयी काळजी करीत नाही. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभु येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे - ते काम म्हणजे- देवाच्या कृपेबद्दल (दयाळूपणबद्दल) ची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे.

2 थेस्सलनीकाकरांस 2:8

आणि मग दुष्ट प्रकट होईल. प्रभु येशू त्याला आपल्या मुखातील श्वासाने मारुन टाकील आणि प्रभु जेव्हा त्याच्या येण्याच्या वेळी मोठ्या वैभवाने प्रकट होईल तेव्हा तो त्याचा नाश करील.

2 तीमथ्थाला 4:7

मी सुयुद्ध जिंकेले आहे. मी माझी शर्यत संपविली आहे. मी विश्वास राखला आहे.

प्रकटीकरण 9:1

पाचव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला, तेव्हा मी आकाशातून एका ताऱ्याला, पृथ्वीवर पडताना पाहिले. अथांगदऱ्याकडे नेणाऱ्या खोल बोगद्याची किल्ली त्याला देण्यात आली.

प्रकटीकरण 11:3

आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना सामर्थ्य देईन.ते देवाचा संदेश 1,260 दिवस देतील. ते तागाची वस्त्रेघालतील.”

प्रकटीकरण 13:1

मग मी एक श्र्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुटहोते आणि प्रत्येक डोक्यावर देवनिंदाव्यंजक नाव लिहिले होते.

प्रकटीकरण 13:7

देवाच्या पवित्रलोकांविरुद्ध युद्ध करण्यास व त्यांना पराभूत करण्यास त्या प्राण्याला शक्ति देण्यात आली. त्या प्राण्याला प्रत्येक वंश, जमात,भाषा आणि राष्ट्रांतील लोकांवर अधिकार देण्यात आला आहे.

प्रकटीकरण 13:11

मग मी एक दुसरे श्र्वापद पृथ्वीतून वर येताना पाहिले. त्याला कोकऱ्यासारखी दोन शिंगे होती. पण ते प्रचंड सापासारखेबोलत होते.

प्रकटीकरण 13:16

दुसऱ्या प्राण्याने सर्व लोकांना - लहानमोठ्या, श्रीमंत आणि गरीब, स्वतंत्र व दास - बळजबरी केली की, त्यांनी त्यांच्या उजव्या हातावर किंवा कपळावर चिन्हकरुन घ्यावे.

प्रकटीकरण 17:6

मी पाहिले ती स्त्री रक्तसेवनाने मस्त झाली होती. ती देवाच्या पवित्र लोकांचे रक्त प्याली होती. ज्या लोकांनी येशूविषयीसांगितले त्याचे रक्त ती प्याली होती.जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा फार आश्चर्यचकित झालो.

प्रकटीकरण 19:19

मग मी ते श्र्वापद आणि पृथ्वीवरील राजे आपापले सैन्य घेऊन जमा झालेले पाहिले. घोडेस्वारबरोबर व त्याच्यासैन्याबरोबर लढाई करण्यासाठी ते जमा झाले होते.

Interlinear

Choose Theme