पाचव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला, तेव्हा मी आकाशातून एका ताऱ्याला, पृथ्वीवर पडताना पाहिले. अथांगदऱ्याकडे नेणाऱ्या खोल बोगद्याची किल्ली त्याला देण्यात आली.
Cross references
तू प्रभात ताऱ्याप्रमाणे होतास, पण आता तू आकाशातून खाली पडला आहेस. पूर्वी सर्व राष्ट्रे तुझ्यापुढे नेहमीच वाकत होती, पण आता तू संपला आहेस.
भुतांनी येशूला विनवणी केली की, आम्हांला अनंतकाळच्या अंधारातजाण्याची आज्ञा करु नको.
तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले!
किंवा “खाली अधोलोकात कोण जाईल? (म्हणजे ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणायला).
तर कोणीही तुम्हाला कोणत्याही प्रकारे फसवू नये. म्हणून सावध असा. मी असे म्हणतो कारण पहिल्यांदा मोठी बंडखोरी झाल्याशिवाय प्रभूचा दिवस येणार नाही. आणि जो नाशासाठी नेमला आहे, तो नियम मोडणारा प्रकट होईल.
हे लक्षात ठेव: शेवटच्या दिवसांत कठीण समय आपल्यावर येतील.
मी मेलो होतो, पण पाहा; मीअनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माइया जवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत.
जेसात तारे तू माइया हातात पाहिलेस आणि ज्यात सात सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्यांचा गुपित अर्थ हा आहे: सातदीपसमया या सात मंडळ्या आहेत. आणि सात तारे हे सात मंडळ्यांचे देवदूत आहेत.
आणि मी सात देवदूतांनादेवासमोर उभे असलेले पाहिले. त्यांना सात कर्णे दिले होते.
मग सात देवदूत त्यांचे कर्णे वाजविण्यास तयार झाले.
तिसऱ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला तेव्हा एक मोठा तारा मशालीप्रमाणे पेटलेला आकाशातून पडला. तो तारानद्यांच्या एक तृतीयांश भागावर पडला आणि झऱ्यांच्या एक तृतीयांश भागावर पडला.
चौथ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा सूर्याच्या एक तृतीयांश भागावर आघात झाला. चंद्राच्या एक तृतीयांशभागावर व ताऱ्यांच्या एक तृतीयांश भागावर आघात झाला. त्यामुळे त्याचा एक तृतीयांश भाग काळा झाला. दिवसाचा एकतृतीयांश काळा भाग झाला. रात्रीचा एक तृतीयांश भाग काळा झाला.
मोठ्या भट्टीतून धूर यावा तसा त्या बोगद्यातून धूर येऊलागला. बोगद्यातून येणाऱ्या धुरामुळे सूर्य आणि आकाश काळे झाले
टोळांचा एक राजा होता. हा राजा अथांग दऱ्याचा दूत होता. यहूदी भाषेतत्याचे नाव अबद्दोन, आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपुल्लोन (विध्वंसमूलक) होते.
दुसरे मोठे संकट संपले. तिसरे मोठे संकट लवकरच येत आहे.
जो श्र्वापद तू पाहिला तो (पूर्वी) होता, आता तो नाही. आणि तो तळविरहीत बोगद्यातून येईल आणि नष्ट केला जाईल.पृथ्वीवर राहणारे लोक ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात पृथ्वीच्या स्थापनेपासून लिहिलेली नाहीत ते जेव्हा श्र्वापदालापाहतील, तेव्हा ते आश्चर्यचकित होतील कारण तो (पूर्वी) होता, आता तो नाही आणि तरी तो येईल.
आणि मी एक देवदूत स्वर्गातून खाली येताना पाहिला. त्याच्या हातात खोल बोगद्याची किल्ली आणि एक मोठासाखळदंड होता.
मग ज्याने त्यांना फसविले होते, त्याला त्या धगधगत्यासरोवरामध्ये, श्र्वापद आणि खोटा संदेष्टा यांना टाकले होते त्या गंधकाच्या तळ्यात टाकण्यात येईल. आणि त्यांनाअनंतकाळ रात्रंदिवस पीडा होत राहील.