देवाने आज्ञा केली आणि जोराचा वारा वाहायला लागला, लाटा उंच उंच जायला लागल्या.
Cross references
परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे. आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
देवाने आज्ञा केली आणि माशा व चिलटे आली. ती सगळीकडे होती.
देवाने आज्ञा केली आणि टोळ व नाकतोडे आले. ते संख्येने इतके होते की ते मोजता येत नव्हते.
देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो. विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो.
देवाने अग्न्नी आणि गारा, बर्फ आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली.
पण परमेश्वराने समुद्रात मोठे तुफान प्रचंड होते आणि गलबत फूटण्याच्या बेताला आले.
गलबत बुडू नये म्हणून गलबतावरचे वजन कमी करावे असे गलबतावरील लोकांना वाटले. म्हणून त्यांनी गलबतावरील माल समुद्रात टाकण्यास सुरवात केली. खलाशी खूपच घाबरले होते. प्रत्येकजण आपापल्या दैवतांची प्रार्थना करु लागले. योना झोपण्यासाठी गलबताच्या खालच्या तळाच्या भागात गेला होता. तो तेथे झोपला होता.
अचानक, समुद्रात इतके मोठे वादळ झाले की, नाव लाटांमध्ये पूर्णपणे गुरफटून गेली. आणि येशू तर नावेत झोपला होता.
वारा फारच जोराने वाहत होता आणि सेरोवरात मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या होत्या.