Home Bibles ☰ Books प्रकटीकरण 17:15 · मराठी बायबल
प्रकटीकरण 17:15 · मराठी बायबल

मग देवदूत मला म्हणाला, “जे पाण्यांचे प्रवाह तू पाहिले, ज्यावर वेश्या बसली होती, ते म्हणजे पुष्कळ लोक,समुदाय, राष्ट्रांचे व भाषा बोलणारे लोक आहेत.

Cross references

स्तोत्रसंहिता 18:4

माझे शत्रू मला मारण्याचा प्रयत्न करीत होते. मृत्यूच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या मृत्युलोकात नेणाऱ्या पुरात मी सापडलो होतो.

स्तोत्रसंहिता 65:7

देवाने उन्मत्त झालेल्या खवळलेल्या समुद्राला शांत केले. देवाने पृथ्वीवर लोकांचे “महासागर” निर्माण केले.

स्तोत्रसंहिता 93:3

परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे. आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.

यशया 8:7

पण मी, परमेश्वर, अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व शक्तीनीशी तुमच्यावर आक्रमण करण्यास भाग पाडीन. युफ्राटिस नदीच्या लोंढ्याप्रमाणे ते येतील. पुराचे पाणी चढत जाऊन नदीच्या किनाऱ्यावरून बाहेर ओसंडून वाहते तसेच ते येतील.

यिर्मया 51:13

बाबेल, तू भरपूर पाण्याच्या ठिकाणी वसली आहेस. तुझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. पण राष्ट्र म्हणून तुझा शेवट जवळ आला आहे. तुझा नाश करण्याची हीच वेळ आहे.

यिर्मया 51:42

समुद्र बाबेलवर पसरेल. त्याच्या गरजणाऱ्या लाटा बाबेलला झाकून टाकतील.

यिर्मया 51:55

लवकरच परमेश्वर बाबेलचा नाश करील. त्या शहरातील कोलाहल तो शांत करील. लाटांच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करीत शत्रू येतील. आजूबाजूचे लोक त्या गर्जना ऐकतील.

प्रकटीकरण 10:11

तेव्हा माल सांगण्यात आले, “तू पुन्हा पुष्कळ लोकांना, राष्ट्रांना, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना वराजांना संदेश सांगितले पाहिजेत.”

प्रकटीकरण 11:9

साडेतीन दिवसांपर्यंत प्रत्येक वंशाचे. जमातीचे, भाषेचे आणि राष्ट्राचे लोक त्या साक्षीदारांच्याशरीरांकडे पाहतील. पण त्यांना पुरण्यास नकार देतील.

प्रकटीकरण 13:7

देवाच्या पवित्रलोकांविरुद्ध युद्ध करण्यास व त्यांना पराभूत करण्यास त्या प्राण्याला शक्ति देण्यात आली. त्या प्राण्याला प्रत्येक वंश, जमात,भाषा आणि राष्ट्रांतील लोकांवर अधिकार देण्यात आला आहे.

प्रकटीकरण 17:1

सात वाट्या असलेल्या सात देवदूतांपैकी एक जण माइयाकडे आला आणि मला म्हणाला, “ये, मी तुला त्या अति नीचवेश्येला झालेली शिक्षा दाखवतो. ती बहुत जलांवर बसली आहे.

Interlinear

Choose Theme