Home Bibles स्तोत्रसंहिता 9:13 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 9:13 · मराठी बायबल

मी देवापाशी ही प्रार्थना केली “परमेश्वरा माझ्यावर दया कर, बघ माझे शत्रू मला त्रास देत आहेत. माझे ‘मृत्यूच्या दारा’ पासून रक्षण कर.

Cross references

उत्पत्ति 4:9

काही वेळाने परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?”काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; माझ्या भावावर नजर ठेवणे व त्याची काळजी घेणे हे माझे काम आहे काय?”

उत्पत्ति 4:10

नंतर परमेश्वर म्हणाला, “तू हे काय केलेस?

1 राजे 21:19

अहाबला जाऊन सांग की परमेश्वर म्हणतो, ‘अहाब, नाबोथला तू मारलेस. आता त्याचा मळा घ्यायला निघालास तेव्हा आता मी सांगतो ते ऐक. नाबोथ मेला त्याच जागी तू सुध्दा मरशील ज्या कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटले तीच कुत्री त्याच ठिकाणी तुझे रक्त चाटतील.”

2 राजे 9:26

परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले तेंव्हा या शेतात मी अहाबला शिक्षा करीन.’ प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!”

2 इतिहास 24:22

जखऱ्याचे वडील यहोयादा यांनी दाखवलेले सौजन्य राजा योवाश विसरला. यहोयादाच्या मुलाला जखऱ्याला राजाने ठार केले. जखऱ्या मृत्यूपूर्वी म्हणाला, “हे पाहून परमेश्वर तुला शासन करो.”

नहेम्या 9:32

हे देवा, तू महान देव आहेस. दरारा उत्पन्न करणारा आणि पराक्रमी योध्दा आहेस तू निष्ठा बाळगणारा आहेस. तू करार पाळतोस आमच्यावर अनेक आपत्ती आल्या आणि आमच्या अडचर्णीना तू महत्व देतोस आम्ही सर्वजण, आमचे राजे आणि नेते, आमचे याजक आणि संदेष्टे या सर्वांवर अरिष्ट आले. अश्शूर राजाच्या काळापासून आजतागायत भयानक गोष्टी ओढवल्या.

स्तोत्रसंहिता 10:12

परमेश्वरा, ऊठ! आणि काहीतरी कर. देवा, दुष्टांना शिक्षा कर गरीबांना विसरु नकोस.

स्तोत्रसंहिता 12:6

परमेश्वराचे शब्द खरे आणि शुध्द आहेत. ते अग्रीत वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत. ते सात वेळा वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत.

स्तोत्रसंहिता 13:3

परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ. माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला उत्तर कळू दे. नाही तर मी मरुन जाईन.

स्तोत्रसंहिता 25:19

माझ्या सर्व शत्रूंकडे नजर टाक. ते माझा तिरस्कार करतात व मला दुख देतात.

स्तोत्रसंहिता 30:3

तू मला थडग्यातून वर उचललेस तू मला जगू दिलेस तू मला खड्‌यात झोपलेल्या मृत लोकात राहू दिले नाहीस.

स्तोत्रसंहिता 38:19

माझे शत्रू जिंवत आहेत व निरोगी आहेत आणि त्यांनी (माझ्याबद्दल) बरेच खोटेनाटे सांगितले आहे.

स्तोत्रसंहिता 51:1

देवा, माझ्यावर दया कर, तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक.

स्तोत्रसंहिता 56:13

का? कारण तू मला मृत्यूपासून वाचवलेस, तू मला पराभवापासून वाचवलेस म्हणून केवळ जिवंत असलेले लोकच जो प्रकाश पाहू शकतात अशा प्रकाशात मी त्याला अनुसरेन.

स्तोत्रसंहिता 86:13

देवा, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे तू माझे मृत्यूलोकापासून रक्षण करतोस.

स्तोत्रसंहिता 107:18

त्या लोकांनी खायचे नाकारले आणि ते जवळ जवळ मेले.

स्तोत्रसंहिता 116:3

मी जवळ जवळ मेलो होतो. मृत्यूचे दोर माझ्या भोवती आवळले गेले होते. माझ्या भोवती थडगे आवळले जात होते. मी खूप घाबरलो होतो आणि चिंतित झालो होतो.

स्तोत्रसंहिता 119:132

देवा, माझ्याकडे बघ आणि माझ्याशी दयाळूपणे वाग. जे लोक तुझ्या नावावर प्रेम करतात त्यांच्यांसाठी योग्य गोष्टी कर.

स्तोत्रसंहिता 119:153

ख बघ आणि माझी सुटका कर. मी तुझी शिकवण विसरलो नाही.

स्तोत्रसंहिता 142:6

परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक मला तुझी फार गरज आहे. जे लोक माझा पाठलाग करतात त्यांच्यापासून मला वाचव. ते लोक मला फार भारी आहेत.

यशया 38:10

मी म्हातारा होईपर्यंत जगावे असे मीच स्वत:शी म्हटले होते. पण अधोलोकाच्या दारातून जाण्याची माझी वेळ आली, आता मला सर्व काळ तेथेच काढावा लागेल असे मला वाटते.

विलापगीत 1:9

यरुशलेमची वस्त्रे मळीन झाली. तिच्यावर बितणाऱ्या गोष्टींची तिला कल्पना नव्हती. तिचे पतन विस्मयकारक होते. तिचे सांत्वन करणारे कोणीही नव्हते. “हे परमेश्वरा” ती म्हणते, “माझी दशा काय झाली आहे पाहा! माझा शत्रू त्याच्या मोठेपणाचा कसा तोरा मिळवितो आहे ते पाहा!”

विलापगीत 1:11

यरुशलेममधील सर्व लोक उसासे टाकत आहेत. ते अन्न शोधत आहेत. तो अन्नाच्या बदल्यात त्यांच्याजवळच्या चांगल्या वस्तू देऊन टाकत आहेत. जगण्यासाठी ते असे करीत आहेत. यरुशलेम म्हणते, “परमेश्वरा, माझ्याकडे जरा पाहा! लोक माझा तिरस्कार कसा करतात ते बघ तरी!

योहान 2:6

त्या ठिकाणी दगडाचे सहा मोठे रांजण होते, यहूदी लोक विशेष विधीप्रसंगी धुण्यासाठीपाणि ठेवण्यासाठी हे रांजण वापरीत असत. प्रत्येक रांजणात वीस ते तीस बादल्या पाणी मावत असे.

Interlinear

Choose Theme