Home Bibles यशया 38:10 · मराठी बायबल
यशया 38:10 · मराठी बायबल

मी म्हातारा होईपर्यंत जगावे असे मीच स्वत:शी म्हटले होते. पण अधोलोकाच्या दारातून जाण्याची माझी वेळ आली, आता मला सर्व काळ तेथेच काढावा लागेल असे मला वाटते.

Cross references

ईयोब 6:11

“माझी शक्ती आता संपली आहे, त्यामुळे जगण्याची इच्छा माझ्यात नाही. माझे काय होणार आहे याची मला काहीच कल्पना नाही. त्यामुळे ज्याच्यासाठी धीर धरावा असे काही कारण उरलेले नाही.

ईयोब 7:7

देवा, माझे आयुष्य म्हणजे केवळ श्र्वास आहे हे आठव. मी पुन्हा कधीही काही चांगले पाहणार नाही.

ईयोब 17:11

माझे आयुष्य संपत चालले आहे. माझ्या योजना धुळीला मिळवल्या गेल्या आणि माझी आशा नष्ट झाली.

स्तोत्रसंहिता 31:23

देवाच्या भक्तांनो, तुम्ही परमेश्वरावर प्रेम करा. परमेश्वर त्याच्यावर विश्वास टाकणाऱ्या लोकांचे रक्षण करतो. परंतु जे लोक स्वतच्या सामर्थ्याचा गर्व करतात त्यांना तो शिक्षा करतो. परमेश्वर त्यांना योग्य अशीच शिक्षा देतो.

स्तोत्रसंहिता 102:24

म्हणून मी म्हणालो, “मला तरुणपणी मरु देऊ नकोस. देवा, तू कायमचाच जगणार आहेस!

स्तोत्रसंहिता 102:25

तू खूप पूर्वी जग निर्माण केलेस. तू तुझ्या हातांनी आकाश निर्माण केलेस.

स्तोत्रसंहिता 107:18

त्या लोकांनी खायचे नाकारले आणि ते जवळ जवळ मेले.

यशया 38:1

ह्या वेळेस, हिज्कीया फार आजारी पडला. जवळ जवळ तो मेलाच होता. अमोजचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याला भेटायला गेला.यशया राजाला म्हणाला, “परमेश्वराने मला तुला सांगायला सांगितले आहे ‘तू लवकरच मरशील, म्हणून तू गेल्यावर तुझ्या घरातील लोकांनी काय करावे हे तू त्यांना सांगावेस. तू ह्या आजारातून उठणार नाहीस.”‘

2 करिंथकरांस 1:9

खरोखर आम्हांला वाटत होते की, आम्ही मरु, पण आम्ही आपल्या स्वत:वर भरंवसा ठेवू नये, यासाठी हे घडले. हे यासाठी घडले की, जो मनुष्यांना मरणातून उठवितो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा.

Interlinear

Choose Theme