Home Bibles उत्पत्ति 4:9 · मराठी बायबल
उत्पत्ति 4:9 · मराठी बायबल

काही वेळाने परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?”काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; माझ्या भावावर नजर ठेवणे व त्याची काळजी घेणे हे माझे काम आहे काय?”

Cross references

उत्पत्ति 3:9

तेव्हा परमेश्वराने आदामाला हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?”

उत्पत्ति 37:26

तेव्हा यहूदा म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारुन आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा?

उत्पत्ति 37:32

नंतर तो रक्ताने भरलेला झगा आपल्या बापाला दाखवून ते म्हणाले, “आम्हाला हा झगा सांपडला; हा झगा योसेफाचा आहे की काय?”

ईयोब 22:13

पण ईयोब, तू कदाचित् म्हणशील देवाला काय समजते? देव काळ्याकुटृ ढाांतून आपल्याकडे बघून निवाडा करु शकतो का?

स्तोत्रसंहिता 9:12

जे परमेश्वराकडे मदतीसाठी गेलेत्यांची आठवण त्याने ठेवली त्या गरीब लोकांना मदतीची याचना केली आणि परमेश्वर त्यांना विसरला नाही.

स्तोत्रसंहिता 9:13

मी देवापाशी ही प्रार्थना केली “परमेश्वरा माझ्यावर दया कर, बघ माझे शत्रू मला त्रास देत आहेत. माझे ‘मृत्यूच्या दारा’ पासून रक्षण कर.

स्तोत्रसंहिता 10:13

वाईट लोक देवाविरुध्द का जातात? कारण देव आपल्याला शिक्षा करणार नाही असे त्यांना वाटते.

नीतिसूत्रे 28:13

माणसाने जर त्याची पापे लपवायचा प्रयत्न केला तर तो कधीही याशस्वी होणार नाही. पण जर त्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि लोकांना सांगितले की त्याचे चुकले तर देव आणि इतर लोक त्याला दया दाखवतील.

योहान 8:44

तुमचा पिता सैतान आहे. तुम्ही त्याचे आहात, त्याला करायला पाहिजे तेच तुम्ही करता. सैतान सुरुनातीपासूनच खुनी आहे. सैतान सत्याच्या विरूद्ध आहे. आणि सैतानाच्या ठायी सत्य नाही. तो सांगतो त्या लबाड्याप्रमाणेच तो आहे. सैतान लबाड आहे. आणि तो असत्याचा पिता आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 5:4

ती जमीन विकण्यापूर्वी तुझी होती. आणि विकल्यानंतर सुद्धा ते पैसे तुला जसे पाहिजे तसे खर्च करता आले असते. अशी वाईट गोष्ट करावी असा विचार तू का केलास? तू मनुष्यांशी नाही, तर देवाशी खोटे बोललास!”

Interlinear

Choose Theme