Home Bibles स्तोत्रसंहिता 74:1 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 74:1 · मराठी बायबल

देवा, तू आम्हाला कायमचाच सोडून गेलास का? देवा, तू तुझ्या माणसांवर अजूनही रागावलेला आहेस का?.

Cross references

निर्गम 32:11

परंतु काकुळतीने विनंती करुन मोशे आपला देव परमेश्वर ह्याला म्हणाला, “परमेश्वरा, तुझ्या रागाने तुझ्या लोकांचा नाश न होवो; तू तुझ्या महान शक्तीने व सामर्थ्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणलेस

अनुवाद 29:20

परमेश्वर अशा माणसाला क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर कोप होईल. इतर सर्व इस्राएलापासून अलग करुन परमेश्वर त्याची नावनिशाणी पुसून टाकील. या ग्रंथातील सर्व शापांचा प्रत्यय त्या माणसाला स्वत:च्या बाबतीत येईल. या नियमशास्त्राच्या ग्रंथातील कराराचा हा एक भाग आहे.

2 राजे 21:14

त्यातूनही काहीजण बचावतील. पण त्यांना मी तसेच सोडीन. त्यांना मी त्यांच्या शत्रूच्या ताब्यात देईन. ते त्यांना युध्दातील लुटीप्रमाणे कैदी करुन नेतील.

स्तोत्रसंहिता 10:1

परमेश्वरा, तू इतक्या दूर का राहतोस? संकटात पडलेले लोक तुला पाहू शकत नाहीत.

स्तोत्रसंहिता 18:8

देवाच्या नाकातून धूर आला देवाच्या तोंडातून अग्रीच्या ज्वाळा निघाल्या. त्याच्या अंगातून ठिणग्या उडाल्या.

स्तोत्रसंहिता 42:9

मी देवाशी माझ्या खडकाशी बोलतो मी म्हणतो “परमेश्वरा, तू मला का विसरलास? माझ्या शत्रूच्या क्रूरतेमुळे मी इतके दु:ख का सहन करावे?”

स्तोत्रसंहिता 42:11

मी इतका दु:खी का आहे? मी इतका खिन्न का आहे? मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे. त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल. तो मला वाचवेल.

स्तोत्रसंहिता 44:9

परंतु देवा, तू आम्हाला सोडून गेलास. तू आम्हाला अडचणीत टाकलेस तू आमच्याबरोबर लढाईत आला नाहीस.

स्तोत्रसंहिता 50:1

परमेश्वर, देवांचा देव बोलला आहे. तो पृथ्वीवरील पूर्व पाश्चिमे कडील सर्व लोकांना बोलावतो.

स्तोत्रसंहिता 60:1

देवा, तू आमच्यावर रागावला होतास म्हणून तू आमचा त्याग केलास आणि आमचा नाश केलास. कृपाकरुन आमच्याकडे परत ये.

स्तोत्रसंहिता 60:10

देवा, हे करण्यासाठी मला फक्त तूच मदत करु शकतोस परंतु तू आम्हाला सोडून गेलास. तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.

स्तोत्रसंहिता 77:7

मी आश्चर्य करतो, “आमचा प्रभु आपल्याला कायमचा सोडून गेला का? तो आपल्याला कधी तरी परत घेईल का?

स्तोत्रसंहिता 77:8

देवाचे प्रेम कायमचे नाहीसे झाले का? तो आपल्याशी कधी तरी परत बोलेल का?

स्तोत्रसंहिता 78:1

लोकहो! माझी शिकवण ऐका, मी काय सांगतो ते ऐका!

स्तोत्रसंहिता 79:5

देवा, तू आमच्यावर कायमचाच रागावणार आहेस का? देवा, तुझे भावनोद्रेक आम्हाला आगीत असेच जाळत राहणार आहेत का?

स्तोत्रसंहिता 79:13

आम्ही तुझी माणसे आहोत, आम्ही तुझ्या कळपातल्या मेंढ्या आहोत. आम्ही सदैव तुझी स्तुती करु. देवा, आम्ही अगदी सर्वकाळ तुझी स्तुती करु.

स्तोत्रसंहिता 80:5

तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस. तेच त्यांचे प्यायचे पाणी होते.

स्तोत्रसंहिता 85:6

कृपा करुन आम्हाला पुन्हा जगू दे. तुझ्या लोकांना सुखी कर.

स्तोत्रसंहिता 95:7

तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे. आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेढरे होऊ.

स्तोत्रसंहिता 100:3

परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या. त्यानेच आपल्याला निर्माण केले. आपण त्याची माणसे आहोत. आपण त्याची मेंढरे आहोत.

यशया 64:8

पण, परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. आम्ही मातीप्रमाणे आहोत आणि तू कुंभार आहेस. तुझ्या हातांनी आम्हाला घडविले आहे.

यिर्मया 23:1

“यहूदातील लोकांच्या मेंढपाळांचे (नेत्यांचे) वाईट होईल, ते मेंढ्यांचा नाश करीत आहेत. ते माझ्या कुरणातून त्यांना चहूबाजूना पळवून लावीत आहेत.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

यिर्मया 31:37

परमेश्वरा म्हणतो, “मी इस्राएलच्या वंशजांना कधीही नाकारणार नाही. लोक जर आकाशाचे मोजमाप करु शकले किवा पृथ्वीच्या पोटातील सर्व रहस्ये जाणू शकले, तरच हे घडणे शक्य आहे. तरच मी इस्राएलच्या वंशजाना नाकारीन. त्यानी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मगच मी त्यांना दूर करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.

यिर्मया 33:24

“यिर्मया, लोक काय बोलतात, ते तू ऐकलेस का? ते लोक म्हणतात ‘परमेश्वर इस्राएल आणि यहूदा या घराण्यापासून दूर गेला. परमेश्वराने त्या लोकांची निवड केली होती.’ पण आता तो त्यांचा राष्ट्र म्हणून सुद्धा स्वीकार करीत नाही.”

विलापगीत 5:22

तू आमच्यावर खूप रागावला होतास! तू आमचा पूर्णपणे त्याग केलास का?

यहेज्केल 34:8

“मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो. हिंस्र पशूंनी माझ्या मेंढ्या पकडल्या. खरंच! माझ्या मेंढ्या वन्य प्राण्यांचे भक्ष्य झाल्या. का? कारण त्यांना खरा मेंढपाळ नव्हता. माझ्या मेंढपाळांनी माझ्या कळपावर लक्ष ठेवले नाही. नाही! त्यांनी फक्त मेंढ्या मारल्या व स्वत:ची पोटे भरली. त्यांनी माझ्या कळपाला खाऊ घातले नाही.”

यहेज्केल 34:31

तुम्ही माझी मेंढरे आहात, माझ्या कुरणातील मेंढरे आहात. तुम्ही फक्त माणसे आहात आणि मी तुमचा देव आहे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

लूक 12:32

“लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हांला त्याचे राज्य द्यावे हे दयाळू पित्याला समधानाचे वाटते.

योहान 10:26

पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. कारण माझी मेंढरे (लोक) नाहीत.

रोमकरांस 11:1

तर मग मी म्हणतो, “देवाने आपल्या लोकांना सोडून दिले आहे काय?” खात्रीने नाही! कारण मीही इस्राएली आहे. अब्राहामापासूनचा, बन्यामिन वंशातला.

Interlinear

Choose Theme