Home Bibles स्तोत्रसंहिता 79:13 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 79:13 · मराठी बायबल

आम्ही तुझी माणसे आहोत, आम्ही तुझ्या कळपातल्या मेंढ्या आहोत. आम्ही सदैव तुझी स्तुती करु. देवा, आम्ही अगदी सर्वकाळ तुझी स्तुती करु.

Cross references

स्तोत्रसंहिता 44:8

आम्ही रोज देवाची स्तुती करु आम्ही तुझ्या नावाची सदैव स्तुती करत राहू.

स्तोत्रसंहिता 45:17

मी तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील असे करीन. लोक सदैव तुझी स्तुती करतील.

स्तोत्रसंहिता 74:1

देवा, तू आम्हाला कायमचाच सोडून गेलास का? देवा, तू तुझ्या माणसांवर अजूनही रागावलेला आहेस का?.

स्तोत्रसंहिता 74:18

देवा, या गोष्टींची आठवण ठेव. शत्रूंनी तुझा प्राण उतारा केला ते लक्षात असू दे. ती मूर्ख माणसे तुझ्या नावाचा तिरस्कार करतात.

स्तोत्रसंहिता 74:22

देवा, ऊठ! आणि युध्द कर! त्या मूर्खांनी तुला आव्हान दिले याची आठवण ठेव.

स्तोत्रसंहिता 95:7

तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे. आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेढरे होऊ.

स्तोत्रसंहिता 100:3

परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या. त्यानेच आपल्याला निर्माण केले. आपण त्याची माणसे आहोत. आपण त्याची मेंढरे आहोत.

स्तोत्रसंहिता 145:4

परमेश्वरा, लोक तुझी तू केलेल्या गोष्टींबद्दल सदैव स्तुती करतील. तू महान गोष्टी करतोस त्याबद्दल ते सांगतील.

यशया 43:21

ह्या लोकांना मी निर्मिले आहे. ते माझी स्तुतिस्तोत्रे गातील.

Interlinear

Choose Theme