वाईट लोकांनो, तुम्ही इथून निघून जा. का? कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
Cross references
दु:ख आणि यातना यांनी मी जवळ जवळ आंधळा झालो आहे, माझे शरीर छायेप्रमाणे अतिशय बारीक झाले आहे.
मी परमेश्वराची प्रार्थना करेन आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल!
माझ्या आयुष्याचा दु:खात शेवट होणार आहे माझी वर्षे सुस्कार टाकण्यात निघून जाणार आहेत. माझी संकटे माझी शक्ती पिऊन टाकत आहेत. माझी शक्ती मला सोडून जात आहे.
मी खूप चिंताक्रांत झालो आहे. मी किती रडलो ते तुला माहीत आहे. तू माझ्या अश्रूंची नक्कीच मोजदाद ठेवली असशील.
देवा, तू माझ्या आत्म्याला मृत्यूपासून वाचवलेस तू माझे अश्रू थोपविलेस. तू मला पतनापासून वाचविलेस.
परमेश्वरा, वाईट लोकांना माझ्याजवळ फिरकू देऊ नकोस आणि मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळीन.
देवा, दुष्ट लोकांना मारुन टाक. त्या खुन्यांना माझ्यापासून दूर ने.
जे कोणी परमेश्वराला मदतीसाठी बोलावतात, त्या सर्वांच्या तो खूप जवळ असतो. जो त्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो, त्याच्या अगदी जवळ तो असतो.
यरूशलेमच्या सियोन डोंगरावर परमेश्वराची माणसे राहतील. तुमचा शोक थांबेल तुमचे रडणे परमेश्वर ऐकेल व तुमचे सांत्वन करील. परमेश्वर तुमचे म्हणणे ऐकेल आणि तुम्हाला मदत करील.
“परमेश्वरा, मी नेहमीच शुध्द मनाने आणि प्रामाणिकपणाने तुझ्यासमोरच जगलो, हे कृपया लक्षात असू दे. मी तू सांगितलेल्या चांगल्या गोष्टीच नेहमी केल्या.” मग हिज्कीया कळवळून रडू लागला.
“हिज्कीयाकडे जाऊन त्याला सांग परमेश्वर, तुझ्या पूर्वजाचा, दाविदाचा, देव म्हणतो, ‘मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे दु:खाश्रू पाहिले, मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षे वाढवीन.
तू माझा आवाज ऐकलास. तू तुझ्या कानावर हात ठेवले नाहीस. माझी सुटका करण्याचे तू नाकारले नाहीस.
तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हांला ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.
मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, ‘माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, अनंतकाळच्या अग्नीत जा. हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे.
आणि तो तुम्हांला म्हणेल, “तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, जे तुम्ही दुष्टपणा करता ते सर्व माझ्यापासून निघून जा.”
येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या काळात, त्याने देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्याला मृत्युपासून वाचवू शकत होता. आणि देवाविषयीच्या त्याच्या सन्माननीय आदरामुळे येशूच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या.