दु:ख आणि यातना यांनी मी जवळ जवळ आंधळा झालो आहे, माझे शरीर छायेप्रमाणे अतिशय बारीक झाले आहे.
Cross references
माझे शरीर किड्यांनी आणि घार्णीनी भरलेले आहे. माझी कातडी सोलवटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे.
तू मला खूप बारीक व अशक्त केले आहे म्हणून मी अपराधी आहे असे लोकांना वाटते.
रडल्यामुळे माझा चेहरा लाल झाला आहे. माझ्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे आहेत.
माझ्या शंत्रूंनी मला खूप त्रास दिला. त्यांचे मला खूप वाईट वाटत आहे. आता माझे डोळे रडून रडून क्षीण झाले आहेत.
वाईट लोकांनो, तुम्ही इथून निघून जा. का? कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
परमेश्वरा, माझ्यावर खूप संकटे आली आहेत. म्हणून माझ्यावर दया कर. मी इतका दुखी कष्टी झालो आहे की माझे डोळे क्षीण झाले आहे माझ्या पोटासह माझे आंतले अवयव दुखत आहेत.
दिवसाच्या शेवटी येणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य संपले आहे असे मला वाटते. कुणीतरी झटकून टाकलेल्या किड्याप्राणे मी आहे असे मला वाटते.
माणसाच्या छोट्याश्या आयुष्यात त्याच्यासाठी पृथ्वीवर काय चांगले आहे ते कोणाला कळणार? त्याचे आयुष्य सावलीप्रमाणे सरकते. पुढे काय घडणार आहे ते त्याला कोणीही सांगू शकणार नाही.
ह्या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे. आम्हाला डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही.