तू माझा आवाज ऐकलास. तू तुझ्या कानावर हात ठेवले नाहीस. माझी सुटका करण्याचे तू नाकारले नाहीस.
Cross references
त्याने देवाची प्रार्थना केली व मदतीसाठी याचना केली. मनश्शेचा धावा ऐकून परमेश्वराला त्याची दया आली. म्हणून त्याला पुन्हा यरुशलेमला आणून परमेश्वराने त्याला गादीवर बसवले. परमेश्वर हाच खरा देव आहे हे तेव्हा मनश्शेला पटले.
मनश्शेची प्रार्थना आणि परमेश्वराला त्याचे गाऱ्हणे ऐकून करुणा वाटणे हे ‘द्रष्टयांच्या बखरीत आहे. मनश्शेला उपरती होण्यापूर्वीची त्याची पापे व दुर्वर्तने, उंच स्थाने व अशेरा स्तंभ जिथे उभारले ती स्थाने याचेही तपशील याच बखरीत आहेत.
हे दुष्ट लोक गरीबांना कष्ट देतात, आणि मदतीसाठी देवाकडे याचना करायला भाग पाडतात.
मी परमेश्वराची प्रार्थना करेन आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल!
माझ्या देवा! माझ्या राजा! माझी प्रार्थना ऐक.
परमेश्वरा, मी रोज सकाळी तुला माझी भेट अर्पण करतो. मी तुइयाकडे मदतीच्या अपेक्षेने पाहातो आणि तू माझी प्रार्थना ऐकतोस.
वाईट लोकांनो, तुम्ही इथून निघून जा. का? कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्याने मला उत्तर दिले.
या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली आणि परमेश्वराने माझे ऐकले. त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली.
देवा, माझी प्रार्थना ऐक कृपा करुन माझी दयेची प्रार्थना टाळू नकोस.
देवा, कृपा करुन माझे ऐक आणि मला उत्तर दे मला माझ्या तक्रारी सांगू दे.
मी पुष्कळ लढाया लढलो आहे. पण देवाने मला नेहमीच सोडविले व सुखरुप परत आणले.
देवाने माझे ऐकले. त्याने माझी प्रार्थना ऐकली.
परमेश्वरा, मी तुला मदत करण्याविषयी विचारत आहे. प्रत्येक दिवशी पहाटे मी तुझी प्रार्थना करतो.
परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो ते मला खूप आवडते.
“हिज्कीयाकडे जाऊन त्याला सांग परमेश्वर, तुझ्या पूर्वजाचा, दाविदाचा, देव म्हणतो, ‘मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे दु:खाश्रू पाहिले, मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षे वाढवीन.
आता परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.मी तुझा दास आहे, माझी मदतीसाठी केलेली प्रार्थना ऐक, तुझ्या पवित्र स्थानाचे भले कर. तुझे पवित्र स्थान ओसाड पडले आहे. पण प्रभु तुझ्या चांगल्यासाठी ह्या चांगल्या गोष्टी कर.
जेव्हा आपण कण्हतो तेव्हा आत्माही आपल्या अशक्तपणात आपणांस मदत करतो. कारण कशासाठी आपण प्रार्थना करावी, हे आपणांस माहीतसुद्धा नसते. परंतु आत्मा स्वत: आपणांसाठी शब्दांनी जे व्यक्त करता येत नाही, अशा कण्हण्याने मध्यस्थी करतो.