माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट गोष्टी करतात आणि मी मात्र त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या. मी केवळ सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला परंतु ते लोक माझ्यावर उलटले.
Cross references
योनाथान आपल्या वडीलांशी बोलला. दावीदबद्दल त्याने चांगले उद्गार आणले. तो म्हणाला, “तुम्ही राजे आहात. दावीद तुमचा सेवक. त्याने तुमचे काहीच वाकडे केलेले नाही. तेव्हा तुम्हीही त्याला इजा पोचू देऊ नका. तो तुमच्याशी चांगलाच वागत आलेला आहे.
तेव्हा दावीद आपल्या लोकांबरोबर कईला येथे गेला. त्यांनी पलिष्ट्यांशी युध्द केले. पलिष्ट्यांचा पराभव करुन त्यांची गुरे पळवली. अशाप्रकारे कईलाच्या लोकांचे त्यांनी रक्षण केले.
पुन्हा दावीदाने विचारले, “कईलाचे लोक मला आणि माझ्या साथीदारांना शौलच्या ताब्यात देतील का?” परमेश्वराने याचेही होय असे उत्तर दिले.
दावीदाच्या लोकांनी आमचे दिवस रात्र रक्षण केले. जणू त्यांनी आमच्या भोवती तटच उभारला होता. आम्ही मेंढरांमागे असतांना त्यांचे आम्हाला संरक्षण होते.
ती भेटायच्या आधी दावीद म्हणत होता, बाल बंटातमी नाबालच्या माल मत्तेचे रक्षण केले. त्याची मेंढरे चुकू देली नाहीत. मी काहीही अपेक्षा न ठेवता हे केले. त्याच्याशी चांगले वागूनही तो आता असे वाईट वागत आहे.
मी माझ्या मित्रांशी दुष्टावा केला नाही आणि मी मित्रांच्या शत्रूंना मदतही केली नाही.
माझ्या सर्व शत्रूंकडे नजर टाक. ते माझा तिरस्कार करतात व मला दुख देतात.
मी फक्त चांगल्याच गोष्टी केल्या आहेत परंतु लोक माझ्या विरुध्द वाईट गोष्टी करतील. परमेश्वरा, मी ज्या चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे त्या मला दे.
माझे खोटे बोलणारे शत्रू हसत राहाणार नाहीत. त्यांच्या गुप्त योजनांमुळे माझ्या शत्रूंना खरोखरच शिक्षा होईल.
लोक माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगत आहेत. ते कारण नसताना माझ्यावर हल्ला करत आहेत.
हा सापळा टाळण्यासाठी मला मदत कर, म्हणजे मी तुझ्या नावाचे गुणगान करीन. चांगले लोक माझ्या बरोबर आनंदोत्सव करतील कारण तू माझी काळजी घेतलीस.
चांगल्याची परतफेड लोकांनी दुष्टाव्याने करावी का? नाही! देवा, मी केलेल्या गोष्टी तुला आठवतात का? मी तुझ्यासमोर उभा राहिलो आणि ह्या लोकांना तू शिक्षा करु नये म्हणून त्यांच्याविषयी चांगल्या गोष्टी मी तुला सांगितल्या. पण ते मला सापळ्यात पकडून ठार मारायला बघत आहेत.
नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
परंतु येशू त्यांना म्हणाला, “पित्यापासून आलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी मी केल्या. त्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. त्यापैकी कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही मला जिवे मारीत आहात?”
जे चांगले ते करण्यास तुम्ही उत्सुक असाल तर अशी कोण व्यक्ती आहे जी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करील? पण,
कारण चांगले काम करुनदेखील आपण दु:ख सोसावे अशी जर देवाची इच्छा असेल तर वाईट करुन दु:ख भोगण्यापेक्षा ते अधिक चांगले.
जर तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहात म्हणून कोणी तुमचा अपमान केला तर तुम्ही धन्य आहात. कारण देवाचा गौरवी आत्मा तुयच्यावर विसावतो.
काईन जो त्या दुष्टाचा (सैतानाचा)होता तसे आम्ही असू नये कारण त्याने त्याच्या भावाला मारले आणि कोणत्या कारणासाठी त्याने त्याला मारले? त्याने तसेकेले कारण त्याची स्वत:ची कृत्ये दुष्ट होती, तर त्याच्या भावाची कृत्ये चांगली होती.