Home Bibles स्तोत्रसंहिता 142:7 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 142:7 · मराठी बायबल

हा सापळा टाळण्यासाठी मला मदत कर, म्हणजे मी तुझ्या नावाचे गुणगान करीन. चांगले लोक माझ्या बरोबर आनंदोत्सव करतील कारण तू माझी काळजी घेतलीस.

Cross references

स्तोत्रसंहिता 7:6

परमेश्वरा ऊठ, आणि तुझा क्रोध दाखव माझा शत्रू रागावलेला आहे म्हणून तू त्याच्या पुढे उभा राहा आणि त्याच्या विरुध्द लढ. परमेश्वरा ऊठ आणि न्यायाची मागणी कर.

स्तोत्रसंहिता 9:3

माझे शत्रू तुझ्यापासून दूर जाण्यासाठी पळाले. परंतु ते पडले आणि त्यांचा नाश झाला.

स्तोत्रसंहिता 9:14

नंतर यरुशलेमच्या द्वारात परमेश्वरा, मी तुझी स्तुती गाईन. तू माझे रक्षण केलेस म्हणून मी खूप आनंदात असेन.”

स्तोत्रसंहिता 13:6

मी परमेश्वरासाठी आनंदाचे गाणे गातो कारण त्याने माझ्यासाठी कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आहेत.

स्तोत्रसंहिता 22:21

सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर.

स्तोत्रसंहिता 31:8

तू माझ्या शत्रूंना मला घेऊन जाऊ देणार नाहीस तू मला त्यांच्या सापळ्यातून मुक्त करशील.

स्तोत्रसंहिता 34:2

विनम्र लोकांनो ऐका आणि आनंदी व्हा माझ्या मनाला परमेश्वराचा गर्व वाटतो.

स्तोत्रसंहिता 38:20

माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट गोष्टी करतात आणि मी मात्र त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या. मी केवळ सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला परंतु ते लोक माझ्यावर उलटले.

स्तोत्रसंहिता 88:4

लोक मला आताच मृत आहे असे समजून वागवतात. मी जगायला अगदी शक्तिहीन आहे असे समजून वागवतात.

स्तोत्रसंहिता 107:41

पण नंतर देवाने त्या गरीब लोकांची संकटातून मुक्तता केली आणि आता त्यांची कुटुंब मेंढ्यांच्या कळपासारखी मोठी आहेत.

स्तोत्रसंहिता 116:7

माझ्या आत्म्या शांत हो! परमेश्वर तुझी काळजी घेतो आहे.

स्तोत्रसंहिता 119:17

माझ्याशी, तुझ्या सेवकाशी चांगला वाग, म्हणजे मी जिवंत राहू शकेन. आणि तुझ्या आज्ञा पाळू शकेन.

स्तोत्रसंहिता 119:74

परमेश्वरा, तुझे भक्त मला पाहातात आणि मला मान देतात. तू जे सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो म्हणून ते आनंदी आहेत.

स्तोत्रसंहिता 142:1

मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारीन. मी परमेश्वराची प्रार्थना करीन.

स्तोत्रसंहिता 143:9

परमेश्वरा, मी तुझ्याकडे संरक्षणासाठी येतो. माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.

स्तोत्रसंहिता 143:11

परमेश्वरा, मला जगू दे, म्हणजे लोक तुझ्या नावाची स्तुती करतील. तू खरोखरच चांगला आहेस हे मला दाखव आणि माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.

स्तोत्रसंहिता 146:7

खी कष्टी आहेत. त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो. तो भुकेल्यांना अन्न देतो. तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो.

यशया 61:1

परमेश्वराचा सेवक म्हणतो, “परमेश्वराने, माझ्या प्रभूने, त्याचा आत्मा माझ्यात घातला. गरीब लोकांना चांगली बातमी सांगण्यासाठी आणि दु:खी लोकांचे सांत्वन करण्यासाठी देवाने मला निवडले. बंदिवानांची आणि कैद्यांची मुक्तता झाली आहे हे सांगण्यासाठी देवाने मला पाठविले.

प्रेषितांचीं कृत्यें 2:24

येशूने मरणाचे दु:ख सहन केले. परंतु देवाने त्याला मुक्त केले, देवाने येशूला मरणातून उठविले, मरण येशूला बांधून ठेवू शकले नाही.

याकोब 5:11

त्यांनी दु:ख सहन केले म्हणून आपण त्यांना धन्य समजतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि तुम्हांला माहीत आहे की, प्रभूने ईयोबाच्या वतीने त्याचा शेवट कसा केला. प्रभु दयाळू आणि खूप कनवाळू आहे, ह्या गोष्टीचे त्याने प्रात्यक्षिक दाखविले.

Interlinear

Choose Theme