1 शमुवेल 23:5 · मराठी बायबल
तेव्हा दावीद आपल्या लोकांबरोबर कईला येथे गेला. त्यांनी पलिष्ट्यांशी युध्द केले. पलिष्ट्यांचा पराभव करुन त्यांची गुरे पळवली. अशाप्रकारे कईलाच्या लोकांचे त्यांनी रक्षण केले.
Cross references
1 शमुवेल 19:8
पुन्हा युध्द सुरु झाले आणि दावीद पलिष्ट्यांशी लढायला गेला. पलिष्ट्यांचा त्याने पराभव केला. त्यांनी पळ काढला.
2 शमुवेल 22:40
देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस. शत्रूचा पाडाव केलास.
स्तोत्रसंहिता 18:38
मी माझ्या शत्रूंचा पराभव करीन. ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत. माझे सगळे शत्रू माझ्या पायाखाली असतील.
स्तोत्रसंहिता 38:20
माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट गोष्टी करतात आणि मी मात्र त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या. मी केवळ सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला परंतु ते लोक माझ्यावर उलटले.