Home Bibles स्तोत्रसंहिता 35:3 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 35:3 · मराठी बायबल

भाला आणि भाल्यासारखे दिसणारे शस्त्र यांनी माझा पाठलाग करणान्या लोकांशी लढ परमेश्वरा, माझ्या जीवाला सांग, “मी तुझे रक्षण करीन.”

Cross references

उत्पत्ति 49:18

“हे परमेश्वरा, तुझ्या कडून उध्दार होण्याची मी वाट पाहात आहे.”

1 शमुवेल 23:26

शौल डोंगराच्या एका बाजूला तर दावीद आणि त्याची माणसे त्याच डोंगराच्या दुसऱ्या बाजूला होती. दावीद शौलपासून निसटून जाण्याच्या घाईत होता. शौल आणि त्याचे सैनिक दावीदला पकडण्यासाठी डोंगराला वेढा घालत होते.

ईयोब 1:10

तू नेहमी त्याचे, त्याच्या कुटुंबाचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतोस. तो जे जे काही करतो त्यांत तू त्याला यशस्वी करतोस. तू त्याला आशीर्वाद दिला आहेस. तो इतका श्रीमंत आहे की सर्व देशभर त्याचे पशुधन पसरलेले आहे.

स्तोत्रसंहिता 27:2

माझे शत्रू जेव्हा माझ्यावर कदाचित् हल्लाकरतील ते कदाचित् माझ्या शरीराचा नाशकरायचा प्रयत्न करतील. माझे शत्रू माझ्यावर हल्ला करुन माझा नाश करण्याचा प्रयत्न करतील.

स्तोत्रसंहिता 51:12

मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो, मला पुन्हा तुझा आनंद दे, माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर.

स्तोत्रसंहिता 62:7

माझा गौरव आणि माझा विजय देवाकडूनच येतो तो माझा भक्‌म किल्ला आहे तो माझी सुरक्षित जागा आहे.

स्तोत्रसंहिता 76:10

तू जेव्हा दुष्टांना शिक्षा करतोस, तेव्हा देवा लोक तुला मान देतात. तू तुझा क्रोध दाखवतोस आणि वाचलेले लोक शक्तिमान होतात.

स्तोत्रसंहिता 91:16

मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन.” आणि त्यांना वाचवीन.

यशया 8:9

सर्व राष्ट्रांनो, युध्दाची तयारी करा, तुम्ही पराभूत व्हाल, दुरवरच्या सर्व देशांनो, ऐका! लढाईची तयारी करा, तुमचा पराभव होईल.

यशया 10:12

सीयोनचा डोंगर व यरूशलेम यांच्याबाबतीत योजलेल्या गोष्टी माझा परमेश्वर पार पाडील. नंतर तो अश्शूरला शिक्षा करील. अश्शूरचा राजा फार गर्विष्ठ आहे. त्याच्या अहंकारामुळे त्याने अनेक दुष्कृत्ये केली आहेत. म्हणून परमेश्वर त्याला शिक्षा करील.

यशया 12:2

देव माझा तारक आहे माझी त्याच्यावर श्रध्दा आहे. मी निर्भय आहे तो मला तारतो. परमेश्वर हीच माझी शक्तीआहे. तो मला तारतो म्हणूनच मी त्याचे स्तुतिस्तोत्र गातो.

लूक 2:30

कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे,

प्रेषितांचीं कृत्यें 4:28

त्यांनी तुझी योजना प्रत्यक्षात आणली, हे सर्व तुइया सामर्थ्याने व तुइया इच्छेने घडले.

Interlinear

Choose Theme