परमेश्वरा ढाल आणि साऱ्या शरीराचे रक्षण करणारी मोठी ढाल उचल. ऊठ आणि मला मदत कर.
Cross references
परमेश्वर महान योद्धा आहे; त्याचे नांव याव्हे आहे.
माझी लखलखाती तलवार परजून मी शत्रूंना शासन करीन. ते याच शिक्षेला पात्र आहेत.
देवाने एकदा निर्णय घेतल्यानंतर तो त्याचे मन बदलत नाही.
तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता. पक्षी जसा आपले पंख पसरुन पिल्लांचे रक्षण करतो तसा तो तुमचे रक्षण करील देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल.
दूरच्या प्रदेशातून परमेश्वर व हे सैन्य येत आहे. क्षितिजापलीकडून ते येत आहेत. ह्या सैन्याचा उपयोग परमेश्वर आपला राग व्यक्त करण्याचे शस्त्र म्हणून करणार आहे. हे सैन्य सर्व देशाचा नाश करील.”
परमेश्वर शूर सैनिकाप्रमाणे बाहेर जाईल लढण्यास सज्ज असलेल्या माणसाप्रमाणे तो असेल. तो खूप उत्तेजित होईल. तो आरोळी ठोकेल आणि मोठ्याने ओरडेल. तो त्याच्या शत्रूचा पराभव करील.