तू जेव्हा दुष्टांना शिक्षा करतोस, तेव्हा देवा लोक तुला मान देतात. तू तुझा क्रोध दाखवतोस आणि वाचलेले लोक शक्तिमान होतात.
Cross references
योसेफाच्या भावांनी योसेफाला दुरुन येताना पाहिले आणि कट करुन त्याला ठार मारण्याचे ठरवले.
तेव्हा यहूदा म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारुन आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा?
तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला, पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता. असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची योजना होती. आजही देवाची तीच योजना आहे.
परंतु मी तुला एका हेतूने ठेवले आहे की मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे. मग सर्व जगाला मी कोण आहे हे कळेल.
शत्रु म्हणाला, ‘मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन, मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल. माझ्या तलवारीने त्यांचे सर्व काही हिरावून घेईन; माझ्या हातांनी त्यांचे सर्वकाही मी स्वत: करिता घेईन.’
परमेश्वर सर्व देवांहून महान आहे हे आता मला कळाले, कारण इस्राएल लोकापेक्षा स्वत:ला चांगले मानीत असलेल्या इतर लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.”
परमेश्वराचे शब्द खरे आणि शुध्द आहेत. ते अग्रीत वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत. ते सात वेळा वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत.
जेव्हा परमेश्वर रागाने गर्जेल आणि पृथ्वी कोलमडेल तेव्हा ती राज्ये भीतीने थरथर कापतील. ती राष्ट्रे पडतील.
देवाने उन्मत्त झालेल्या खवळलेल्या समुद्राला शांत केले. देवाने पृथ्वीवर लोकांचे “महासागर” निर्माण केले.
देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो. देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.
तू समुद्राला मर्यादा घातलीस आणि आता पाणी पृथ्वीला कधीही झाकून टाकणार नाही.
तो गरिबांना प्रामाणिकपणे व सरळपणे न्याय देईल. ह्या देशातील गरिबांसाठी ज्या गोष्टी करण्याचे त्याने ठरविले असेल त्या तो न्यायबुध्दीने करील. त्याने जर काही लोकांना फटकावयाचे ठरविले तर तो तशी आज्ञा देईल आणि त्या माणसांना फटके बसतील. त्याने दुष्टांना मारायचे ठरविले, तर त्याच्या आज्ञेने त्यांना ठार मारले जाईल. चांगलुपणा व प्रामाणिकपणा ह्या मुलाला सामर्थ्य देईल. ते त्याचे संरक्षक कवच असतील.
मग नबुखद्नेस्सराला खूप राग आला. त्याने शद्रख मेशख व अबेद्नगो यांच्याकडे तुच्छतेने पाहिले. त्याने भट्टी नेहमीपेक्षा सातपट तापविण्याची आज्ञा दिली.
ज्ञानी लोक गेल्यानंतर, प्रभूचा दूत स्वप्नात येऊन योसेफाला म्हणाला, “ऊठ! बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन निसटून इजिप्त देशास जा. कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेणार आहे, तेव्हा मी तुला धोका टळल्याची सूचना देईपर्यंत इजिप्तमध्येच राहा.”
आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीच वाचले नसते. परंतु त्याच्या निवडलेल्यांमुळे तो ते दिवस थोडे करील.
पिलाताने म्हटले, “मी जे लिहिले ते लिहिले.”
या भूतलावरील राजे लढाईसाठी सज्ज झाले आणि प्रभु परमेश्वर व त्याचा रिव्रस्त यांच्याविरुद्ध एकवट झाले आहेत.’ स्तोत्र. 2:1-2
हेरोदाने पाहिले की, यहूदी लोकांना हे आवडले आहे.म्हणून त्याने पेत्रालासुद्धा अटक करण्याचे ठरविले. (हे वल्हांडण सणाच्या काळात घडले.)
कारण पवित्र शास्त्रात देव फारोला म्हणाला, “याच हेतूसाठी मी तुला उच्च केले यासाठी की मी तुझ्यामध्ये आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर गाजविले जावे.
जगातील लोक रागावले पण आता तुझा राग आला आहे, आता मेलेल्या माणसांचा न्याय करण्याची वेळ आली आहे.तुझे सेवक, संदेष्टे यांना बक्षीस देण्याची वेळ आली आहे. आणि तुझ्या पवित्र लोकांना बक्षिस देण्याची वेळ आली आहे. जेलहानमोठे लोक तुझा आदर करतात, त्यांना बक्षिस देण्याची वेळ आली आहे. जे पृथ्वीचा नाश करतात, त्यांचा नाशकरण्याची वेळ आली आहे!”