Home Bibles यशया 13:5 · मराठी बायबल
यशया 13:5 · मराठी बायबल

दूरच्या प्रदेशातून परमेश्वर व हे सैन्य येत आहे. क्षितिजापलीकडून ते येत आहेत. ह्या सैन्याचा उपयोग परमेश्वर आपला राग व्यक्त करण्याचे शस्त्र म्हणून करणार आहे. हे सैन्य सर्व देशाचा नाश करील.”

Cross references

यशया 5:26

पाहा! दूरच्या राष्ट्रांना देव खूण करीत आहे, झेंडा उभारून तो त्या राष्ट्रांना आवाहन करीत आहे. दूरवरून शत्रू येत आहे. लवकरच तो या देशात प्रवेश करील. तो फार वेगाने येत आहे.

यशया 13:17

देव म्हणतो, “पाहा! बाबेलोनवर हल्ला करण्यासाठी मी मेदीचे सैन्य वापरीन. मेदीच्या सैन्याला चांदी, सोने दिले तरी ते हल्ला करीतच राहील.

यशया 24:1

पाहा! परमेश्वर ह्या देशाचा नाश करील. ही भूमी पूर्णपणे स्वच्छ करील. परमेश्वर लोकांना बळजबरीने दूर जायला लावील.

यिर्मया 50:3

उत्तरेकडचे राष्ट्र बाबेलवर चढाई करील. ते राष्ट्र बाबेलचे ओसाड वाळवंट करील. तेथे कोणीही राहणार नाही. माणसे व प्राणी, दोघेही, तेथून पळ काढतील”

यिर्मया 50:9

मी उत्तरेकडून खूप राष्ट्रांना एकत्र आणीन. ते बाबेलविरुद्ध लढायला सज्ज होतील. उत्तरेकडचे लोक बाबेल काबीज करतील. ते बाबेलवर बाणांचा वर्षाव करतील. ते बाण, युद्धावरुन रिकाम्या हाताने कधीच न परतणाऱ्या, सैनिकांप्रमाणे असतील.

यिर्मया 50:25

परमेश्वराने आपले कोठार उघडले आहे. त्यांच्या क्रोधाची हत्यारे परमेश्वराने बाहेर आणली आहेत. खास्द्यांच्या देशात सर्वशक्तिमान परमेश्वर देवाला काम करायचे असल्याने त्याने ती हत्यारे बाहेर काढली आहेत.

यिर्मया 51:11

बाण धारदार करा! ढाली घ्या. परमेश्वराला मेद्यांच्या राजाकडून बाबेल नष्ट करायचे होते, म्हणून त्याने त्यांना स्फूर्ती दिली. बाबेलच्या लोकांना योग्य अशी शिक्षा परमेश्वर करील. बाबेलच्या सैन्याने यरुशलेममधील परमेश्वराचे मंदिर उध्वस्त केले. त्याबद्दल परमेश्वर त्यांना यथायोग्य शिक्षा करील.

यिर्मया 51:20

परमेश्वर म्हणतो, “बाबेल, तू माझा दंडुका आहेस. तुझा उपयोग मी राष्ट्रांची शकले व राज्यांचा नाश करण्यासाठी केला.

मत्तय 24:31

मनुष्याचा पुत्र तुतारीचा मोठा नाद करून आपले दूत पृथ्तीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.

Interlinear

Choose Theme