Home Bibles स्तोत्रसंहिता 3:5 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 3:5 · मराठी बायबल

मी पडून विश्रांती घेतो तरी मी जागा होईन हे मला माहीत आहे. मला हे कसे कळते? कारण परमेश्वर मला सांभाळतो माझे रक्षण करतो.

Cross references

लेवीय 26:6

मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हाला कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करुन येणार नाही.

ईयोब 11:18

नंतर तुला सुरक्षित वाटेल. कारण तेव्हा तिथे आशा असेल. देव तुझी चिंता वाहील आणि तुला विश्रांती देईल.

स्तोत्रसंहिता 4:8

मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो का? कारण परमेश्वरा, तू मला सुरक्षित ठेवून झोपवतोस.

स्तोत्रसंहिता 34:5

देवाकडे मदतीसाठी वळा तुमचा स्वीकार होईल लाज वाटून घेऊ नका.

स्तोत्रसंहिता 66:9

देवाने आम्हाला जीवन दिले. देव आम्हाला संरक्षण देतो.

स्तोत्रसंहिता 127:2

भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. देव ज्या लोकांवर प्रेम करतो त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.

नीतिसूत्रे 3:24

तू जेव्हा झोपशील तेव्हा घाबरणार नाहीस. तू विश्रांती घेशील तेव्हा तुझी झोप शांत असेल.

नीतिसूत्रे 14:26

जो परमेश्वराचा आदर करतो तो सुरक्षित असतो आणि त्याची मुलेही सुरक्षितपणे जगतात.

नीतिसूत्रे 18:10

परमेश्वराच्या नावात खूप शक्ती आहे. तो बळकट बुरुजाप्रमाणे आहे. चांगले लोक त्यांच्याकडे जाऊ शकतात आणि सुरक्षित होतात.

यशया 26:3

परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस.

प्रेषितांचीं कृत्यें 12:6

पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता. त्याला साखळ्यांनी बांधले होते. तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते. ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे.

Interlinear

Choose Theme