Home Bibles ☰ Books नीतिसूत्रे 3:24 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 3:24 · मराठी बायबल

तू जेव्हा झोपशील तेव्हा घाबरणार नाहीस. तू विश्रांती घेशील तेव्हा तुझी झोप शांत असेल.

Cross references

लेवीय 26:6

मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हाला कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करुन येणार नाही.

2 इतिहास 20:30

त्यामुळे यहोशाफाटच्या राज्यात शांतता नांदली. देवाने यहोशाफाटला सर्व बाजूंनी स्वास्थ्य दिले.

ईयोब 11:19

तू विश्रांती घेण्यासाठी आडवा होऊ शकशील आणि तुला कोणीही त्रास देणार नाही. तुझ्याकडे खूप लोक मदतीसाठी येतील.

स्तोत्रसंहिता 3:5

मी पडून विश्रांती घेतो तरी मी जागा होईन हे मला माहीत आहे. मला हे कसे कळते? कारण परमेश्वर मला सांभाळतो माझे रक्षण करतो.

स्तोत्रसंहिता 3:6

माझ्याभोवती हजारो सैनिक असतील. परंतु मी या शत्रूंना घाबरणार नाही.

स्तोत्रसंहिता 4:8

मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो का? कारण परमेश्वरा, तू मला सुरक्षित ठेवून झोपवतोस.

स्तोत्रसंहिता 91:5

रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही.

स्तोत्रसंहिता 121:4

इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही. देव कधीही झोपत नाही.

स्तोत्रसंहिता 127:2

भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. देव ज्या लोकांवर प्रेम करतो त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.

नीतिसूत्रे 6:22

त्यांची शिकवण तुला जिथे जायचे असेल तिथे नेईल. तू झोपलास की ती तुझ्यावर लक्ष ठेवेल आणि तू जेव्हा उठशील तेव्हा ती तुझ्याशी बोलेल आणि तुला मार्ग दाखवील.

नीतिसूत्रे 19:23

जो माणूस परमेश्वराचा आदर करतो त्याचे आयुष्य चांगले असते. आयुष्यात समाधानी असतो आणि त्याला संकटांची चिंता नसते.

यशया 54:14

चांगुलपणाच्या पायावर तुझी उभारणी होईल. म्हणून क्रौर्य आणि भय यांपासून तू सुरक्षित असशील. तुला कशाची भीती बाळगण्याचे कारण पडणार नाही. कशापासूनही तुला इजा होणार नाही.

यिर्मया 31:26

हे ऐकल्यानंतर, मी (यिर्मया) उठलो, आणि आजूबाजूला पाहिले. ती खरोखरच फार सुखद निद्रा होती.

Interlinear

Choose Theme