Home Bibles नीतिसूत्रे 18:10 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 18:10 · मराठी बायबल

परमेश्वराच्या नावात खूप शक्ती आहे. तो बळकट बुरुजाप्रमाणे आहे. चांगले लोक त्यांच्याकडे जाऊ शकतात आणि सुरक्षित होतात.

Cross references

उत्पत्ति 17:1

अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला परमेश्वर म्हणाला, “मी सर्वशक्तिमान देव आहे; माझ्यासाठी पुढील प्रमाणे गोष्टी कर: माझ्या आज्ञा पाळ, आणि योग्य मार्गाने चाल व सात्विकतेने राहा.

उत्पत्ति 32:11

मी तुझी प्रार्थना करतो की कृपाकरुन तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव; मला त्याची भीती वाटते, की तो येऊन आम्हा सर्वांस ठार मारील; मुलांच्या मातांनाही लेंकरासकट तो मारुन टाकील.

उत्पत्ति 32:28

तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नांव इस्राएल असेल. मी हे नांव तुला देत आहे कारण तू देवाशी व माणसांशी झोंबी केली आहेस आणि तू हरला नाहीस तर जिंकलास.”

निर्गम 3:13

मग मोशे देवाला म्हणाला, “परंतु मी जर इस्राएल लोकाकडे जाऊन म्हणालो, ‘तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे;’ तर मग ते लोक विचारतील ‘त्याचे नाव काय आहे?’ मग मी त्यांना काय सांगू?”

निर्गम 6:3

“मी परमेश्वर आहे मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना दर्शन दिले; त्यांनी मला ‘एल-शदाय’ असे नाव दिले; त्यांना ‘याव्हे’ (म्हणजे ‘परमेश्वर’) हे माझे नाव माहीत नव्हते.

निर्गम 34:5

मोशे पर्वतावर आल्यावर परमेश्वर एका ढगातून त्याच्याकडे खाली उतरला व तो मोशेपाशी उभा राहिला; तेव्हा मोशेने परमेश्वराचे नाव घेतले.

1 शमुवेल 17:45

यावर दावीद त्या पलिष्टी गल्याथला म्हणाला, “तुझी तलवार, भाला-बरची यांच्या बळावर तू माझ्याकडे आला आहेस. पण मी मात्र इस्राएलच्या सैन्याच्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे नाव घेऊन तुला सामोरा येत आहे. तू त्याला दूषणे दिली होतीस.

1 शमुवेल 30:6

आपल्या सर्व मुलाबाळांना कैदी म्हणून धरुन नेलेले पाहून सर्व सैन्याला दु:ख आणि संतापाने घेरले. दावीदला दगडांनी ठेचून मारावे असा विचार लोक बोलून दाखवू लागले. त्यामुळे दावीद फार व्याथित झाला. पण तो परमेश्वरावर भरवंसा ठेवून खंबीर राहिला.

2 शमुवेल 22:3

तो माझा देव माझ्या संरक्षणासाठी मी या दुर्गाच्या, देवाच्या आश्रयाला जातो. देव म्हणजे माझी संरक्षक ढाल आहे त्याचे सामर्थ्य माझे रक्षण करते. परमेश्वर म्हणजे माझी लपण्याची जागा, माझ्या सुरक्षिततेचे ठिकाण उंच डोंगरात असलेले. क्रूर शत्रूपासून तो मला वाचवतो.

2 शमुवेल 22:45

आता दूर देशचे लोक माझे ऐकतात, जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो.

2 शमुवेल 22:51

परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो. आपल्या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो. दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील.

स्तोत्रसंहिता 18:2

परमेश्वर माझा खडक माझा किल्ला माझी संरक्षक जागा आहे. माझा देव माझा खडक आहे. मी माझ्या रक्षणासाठी त्याच्याकडे धाव घेतो. देव माझी ढाल आहे. त्याची शक्ती नेहमी माझे रक्षण करते.परमेश्वर माझी उंच डोंगरावरची लपण्याची जागा आहे.

स्तोत्रसंहिता 20:2

देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो. तो तुम्हाल सियोनातून साहाय्य करो.

स्तोत्रसंहिता 27:1

परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस. मला कुणाचीही भीती बाळगायला नको. परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे. म्हणून मी कुणालाही भीत नाही.

स्तोत्रसंहिता 56:3

मी जेव्हा घाबरतो तेव्हा तुझ्यावर भरंवसा ठेवतो.

स्तोत्रसंहिता 61:3

तूच माझी सुरक्षित जागा आहेस. माझ्या शत्रूपासून माझे रक्षण करणारा तू बळकट किल्ला आहेस.

स्तोत्रसंहिता 61:4

तुझ्या तंबूत मला कायमचे राहायला पाहिजे, जेथे तू माझे रक्षण करु शकशील अशा ठिकाणी मला लपण्याची इच्छा आहे.

स्तोत्रसंहिता 91:2

मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला, माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.”

स्तोत्रसंहिता 91:14

परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.

स्तोत्रसंहिता 144:2

परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझी पर्वतावरची उंचसुरक्षित जागा आहे. परमेश्वर माझी सुटका करतो. परमेश्वर माझी ढाल आहे. मी त्याच्यावर वश्वास ठेवतो. परमेश्वर मला माझ्या लोकांवर राज्य करायला मदत करतो.

नीतिसूत्रे 14:26

जो परमेश्वराचा आदर करतो तो सुरक्षित असतो आणि त्याची मुलेही सुरक्षितपणे जगतात.

यशया 9:6

असामान्य बालकाच्या जन्माच्यावेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल “अदभुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र.”

यशया 26:4

म्हणून नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण परमेश्वर हा तुमच्यासाठी निरंतर सुरक्षित आसरा आहे.

यशया 57:15

देव अती उच्च व परम थोर आहे. देव चिरंजीव आहे. त्याचे नाव पवित्र आहे. देव म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो हे खरे पण मी दु:खी आणि लीन यांच्याबरोबरही असतो. मनाने नम्र असलेल्यांना आणि दु:खी लोकांना मी नवजीवन देईन.

यिर्मया 23:6

त्या चांगल्या ‘अंकुराच्या’ काळात यहूदातील लोक वाचतील आणि इस्राएल सुरक्षित राहील. त्याचे नाव असेल परमेश्वर आमचा चांगुलपणा.

हबक्कूक 3:19

परमेश्वर, माझा प्रभू मला शक्ती देतो. हरिणाप्रमाणे जलद धावायला मदत करोत देवच मला सुरक्षितपणे पर्वतांवर नेतो.माझ्या तारा लावलेल्या वाद्यांत असलेल्या त्या संगीत दिग्दर्शकाला.

मत्तय 1:23

“कुमारी गर्भवती होईल, ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला ‘इम्मानुएल’ म्हणजे ‘आमच्याबरोबर देव आहे’ असे म्हणतील.”

प्रकटीकरण 1:8

प्रभु देव म्हणातो, “मी अल्फा आणि ओमेगाआहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे. मी सर्वसमर्थ आहे.”

Interlinear

Choose Theme