परमेश्वरा, म्हणून मी तुझी स्तुती करतो म्हणून मी तुझ्या नावाचे देशांत गुणगान गातो.
Cross references
म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन. तुझे नामसंकीर्तन करीन.
सियोनमध्ये इस्राएलला कुणी वाचवले? परमेश्वरच इस्राएलला वाचवतो. परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले. परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील नतंर याकोब (इस्राएल) खूप आंनदी होईल.
परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सतत स्तुती करीन. अगदीच निशब्दता कधीच असू नये म्हणून मी हे करीन. तुझी स्तुती करण्यासाठी नेहमीच कुणीतरी असेल. 13
माझ्या प्रभु, मी सर्वांकडे तुझी स्तुती करतो. मी सर्व देशात तुझ्या स्तुतीची गीते गातो.
परमेश्वर देवाची, इस्राएलाच्या देवाची स्तुती करा. फक्त देवच अशा अद्भूत गोष्टी करु शकतो.
देवा, मी तयार आहे. मी गुणगान गायला मनापासून तयार आहे.
परमेश्वरा, आम्ही तुझी इतर देशांत स्तुती करु. आम्ही इतर लोकांत तुझी स्तुती करु.
परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझे बोलणे ऐकतील तेव्हा ते तुझी स्तुती करतील.
मग त्यांनी वल्हांडणाचे गीत गाईले. नंतर ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले.
यासाठी की यहूदीतर लोक देवाने त्यांच्यावर दाखविलेल्या दयेबद्दल गौरव करतील, पवित्र शास्त्रात लिहिले आहे:“म्हणून विदेशी लोकांमध्ये मी तुझे उपकार मानीन. आणि तुझ्या नावाची स्तुति करीन.” स्तोत्र. 18:49
जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो.