देवा, मी तयार आहे. मी गुणगान गायला मनापासून तयार आहे.
Cross references
नंतर मोशे व इस्राएल लोक परमेश्वराला हे गीत गाऊ लागले “मी परमेश्वराला गीत गाईन कारण त्याने महान कृत्ये केली आहेत; घोडा व स्वार यांना त्याने समुद्रात फेकून दिले आहे.
त्यामुळे माझे ह्दय आणि माझा आत्मा आनंदीत राहील माझे शरीरही सुरक्षित असेल.
परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सतत स्तुती करीन. अगदीच निशब्दता कधीच असू नये म्हणून मी हे करीन. तुझी स्तुती करण्यासाठी नेहमीच कुणीतरी असेल. 13
मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन. माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल.
परंतु देव मला सुरक्षित ठेवील. तो मला साहसी करील. मी त्याचे गुणगान गाईन.
देवा, ऊठ आणि तुझ्या वैऱ्यांची दाणादाण उडव. त्याचे सगळे वैरी त्याच्यापासून दूर पळोत.
तू केलेल्या अद्भुत गोष्टींचे मी नेहमी गुणगान करीत असतो.
तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन, तू जेव्हा जेव्हा मला वाचवलेस त्याबद्दलही मी सांगेन. ते प्रसंग मोजता न येण्याइतके अगणित होत.
तू माझ्या आत्म्याचा उध्दार केलास. माझा आत्मा आनंदी होईल. मी माझ्या ओठांनी स्तुतिगीते गाईन.
मी आयुष्यभर परमेश्वराला गाणे गाईन. मी जिवंत असे पर्यंत परमेश्वराचे गुणगान करीन.
देवा, मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो. मी सर्व देवांसमोर तुझे गाणे गाईन.
देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.
मी परमेश्वराची स्तुती करेन. प्रत्येकाने त्याच्या पवित्र नावाचा सतत जयजयकार करावा असे मला वाटते.