Home Bibles स्तोत्रसंहिता 18:48 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 18:48 · मराठी बायबल

परमेश्वरा, तू माझी माझ्या शत्रूंपासून सुटका केलीस जे लोक माझ्याविरुध्द उभे राहिले त्यांचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस. तू मला क्रूर माणसांपासून वाचवलेस.

Cross references

स्तोत्रसंहिता 7:16

त्यांना योग्य अशी शिक्षा मिळेल. ते इतरांशी फार निर्दयपणे वागले. त्यांनाही योग्य अशीच शिक्षा मिळेल.

स्तोत्रसंहिता 22:27

दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो. आणि ते परमेश्वराकडे परत येवोत. सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत.

स्तोत्रसंहिता 59:1

देवा, मला माझ्या शत्रूंपासून वाचव माझ्याशी लढायला जे लोक आले आहेत त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी मला मदत कर.

स्तोत्रसंहिता 86:14

गर्विष्ठ लोक माझ्यावर हल्ला करतात. देवा, वाईट लोकांचा समूह मला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते लोक तुला मान देत नाहीत.

स्तोत्रसंहिता 89:13

देवा, तुझ्याजवळ शक्ती आहे. तुझीशक्ती महान आहे. विजय तुझाच आहे.

स्तोत्रसंहिता 140:1

परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव दुष्टांपासून माझे रक्षण कर.

स्तोत्रसंहिता 140:4

परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव. वाईट लोकांपासून माझे रक्षण कर. ते लोक माझा पाठलाग करतात, आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात.

स्तोत्रसंहिता 140:11

परमेश्वरा, त्या खोटारड्यांना जगू देऊ नकोस. त्या वाईट लोकांचे वाईट होऊ दे.

फिलिप्पैकरांस 2:9

म्हणून देवाने सुद्धा त्याला अत्युच्च केले, व सर्व नावाहून जे नाव श्रष्ठ आहे ते त्याला दिले.

Interlinear

Choose Theme