Home Bibles स्तोत्रसंहिता 146:5 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 146:5 · मराठी बायबल

पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात. ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.

Cross references

उत्पत्ति 32:24

नदी उतरुन पलीकडे जाण्यात याकोब सर्वात शेवटी होता; परंतु नदी उतरुन जाण्यापूर्वी तो अद्याप एकटाच असताना एक पुरुष आला व त्याने याकोबाशी झोंबी केली. सूर्य उगवेपर्यंत त्याने त्याच्याशी झोंबी केली

उत्पत्ति 50:17

तो म्हणाला, ‘योसेफाला सांगा की तुझ्या भावांनी तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो.’ तेव्हा हे योसेफा, आम्ही तुला अशी विनंती करतो की, आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर. आम्ही देवाचे, तुझ्या बापाच्या देवाचे दास आहोत.योसेफाचे भाऊ वरीलप्रमाणे बोलले त्यामुळे योसेफाला फार दु:ख झाले व तो रडला.

निर्गम 3:6

मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव आहे.”देवाकडे पाहाण्यास मोशेला भीती वाटली म्हणून त्याने आपले तोंड झाकून घेतले.

अनुवाद 33:29

इस्राएला, तू आशीर्वादीत आहेस. इतर कोणतेही राष्ट्र तुझ्यासारखे नाही. परमेश्वराने तुला वाचवले आहे. भक्कम ढालीप्रमाणे तो तुझे रक्षण करतो. परमेश्वर म्हणजे तळपती तलवार. शत्रूंना तुझी दहशत वाटेल. त्यांची पवित्र स्थाने तू तुडवशील!”

स्तोत्रसंहिता 20:8

त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला. ते युध्दात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो.

स्तोत्रसंहिता 33:12

ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत. देवाने त्यांची विशेष माणसं म्हणून निवड केली.

स्तोत्रसंहिता 39:7

तेव्हा प्रभु, मला काही आशा आहे का? तूच माझी आशा आहेस!

स्तोत्रसंहिता 46:7

तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्या बरोबर आहे. याकोबाचा देव ही आपल्यासाठी सुरक्षित जागा आहे.

स्तोत्रसंहिता 46:8

परमेश्वर ज्या शक्तिशाली गोष्टी करतो त्या बघ, तो पृथ्वीवर ज्या भयंकर गोष्टी आणतो त्या बघ.

स्तोत्रसंहिता 46:11

तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे. याकोबाचा देव ही आपली सुरक्षित जागा आहे.

स्तोत्रसंहिता 71:5

प्रभु, तू माझी आशा आहेस मी तरुण मुलगा असल्यापासूनच तुझ्यावर विश्वास टाकला आहे.

स्तोत्रसंहिता 84:8

सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक याकोबाच्या देवा, माझे ऐक.

स्तोत्रसंहिता 84:12

सर्वशक्तिमान परमेश्वरा, जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात ते खरोखरच सुखी असतात. 13

स्तोत्रसंहिता 144:15

अशा वेळी लोक खूप आनंदी असतात. जर परमेश्वर त्यांचा देव असेल तर लोक खूप आनंदी असतात.

नीतिसूत्रे 16:20

जर एखादा माणूस लोकांच्या शिकवण्याकडे लक्ष देईल तर त्याचा फायदा होईल. आणि जो माणूस परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला आशीर्वाद मिळतो.

यिर्मया 17:7

परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यावर कृपादृष्टी होईल. का? कारण परमेश्वर विश्वासास प्रात्र आहे, ह्याची देव त्याला प्रचिती देईल.

1 पेत्र 1:21

ज्या देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले व त्याला गौरव दिले त्या देवावर तुम्ही विश्वास ठेवणारे झाला आहात. म्हणून तुमचा विश्वास आणि आशा देवामध्ये आहे.

Interlinear

Choose Theme