Home Bibles स्तोत्रसंहिता 148:7 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 148:7 · मराठी बायबल

पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा. महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा.

Cross references

उत्पत्ति 1:21

समुद्रातील प्रचंड जलचर म्हणजे पाण्यात फिरणारे व अनेक जातीचे व प्रकारचे जलप्राणी देवाने उत्पन्न केले. तसेच आकाशात उडणारे निरनिराळड्या जातीचे पक्षीही देवाने उत्पन्न केले आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.

1 राजे 13:28

तेव्हा तो निघाला आणि वाटेवरच्या मृतदेहापाशी आला. सिंह आणि गाढव अजूनही तिथेच होते. सिंहाने आपल्या भक्ष्याला तोंड लावले नव्हते की गाढवाला इजा केली नव्हती.

ईयोब 41:1

“ईयोब, तुला लिव्याथानाला गळ टाकून पकडता येईल का? तुला त्याची जीभ दोरीने बांधता येईल का?

स्तोत्रसंहिता 74:13

देवा, लाल समुद्र दुभागण्यासाठी तू तुझ्या शक्तीचा उपयोग केलास.

स्तोत्रसंहिता 104:24

परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस. तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे. तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.

स्तोत्रसंहिता 104:25

समुद्राकडे बघ, तो किती मोठा आहे! आणि त्यात किती तरी गोष्टी राहातात. तिथे लहान मोठे प्राणी आहेत. मोजता न येण्याइतके.

यशया 27:1

भूमी यापुढे मृतांना झाकून ठेवणार नाही. त्या वेळेला लिव्याथान ह्या कपटी सर्पाचा परमेश्वर न्यायनिवाडा करील. वेटोळे घालून बसलेल्या लिव्याथान सर्पाला परमेश्वर आपल्या मोठ्या, कठीण व बलवान तलवारीने शिक्षा करील. समुद्रातील प्रचंड धुडाला तो मारील.

यशया 43:20

हिंस्र पशुसुध्दा माझे आभार मानतील. मोठे प्राणी आणि पक्षी मला मान देतील. मी जेव्हा वाळवंटात पाणी आणि कोरड्या जमिनीवर नद्या निर्माण करीन तेव्हा ते माझा आदर करतील. मी निवडलेल्या. माझ्या लोकांना पाणी मिळावे म्हणून मी हे करीन.

यशया 51:9

परमेश्वराच्या बाहूंनो जागे व्हा (सामर्थ्या) जागा हो ऊठ आणि बलवान हो. प्राचीन काळी वापरली होतीस तशी तुझी शक्ती वापर. राहाबचा पराभव करणारी शक्ती तूच आहेस. तू आक्राळ-विक्राळ मगरीचा पराभव केलास.

Interlinear

Choose Theme