Home Bibles यशया 43:20 · मराठी बायबल
यशया 43:20 · मराठी बायबल

हिंस्र पशुसुध्दा माझे आभार मानतील. मोठे प्राणी आणि पक्षी मला मान देतील. मी जेव्हा वाळवंटात पाणी आणि कोरड्या जमिनीवर नद्या निर्माण करीन तेव्हा ते माझा आदर करतील. मी निवडलेल्या. माझ्या लोकांना पाणी मिळावे म्हणून मी हे करीन.

Cross references

1 इतिहास 16:13

इस्राएलचे लोक परमेश्वराचे सेवक आहेत. याकोबाचे वंशज हे परमेश्वराने निवडलेले खास लोक आहेत.

स्तोत्रसंहिता 33:12

ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत. देवाने त्यांची विशेष माणसं म्हणून निवड केली.

स्तोत्रसंहिता 104:21

सिंह हल्ला करताना गर्जना करतात. जणू काही ते देवाकडे तू देत असलेल्या अन्नाची मागणी करीत आहेत.

स्तोत्रसंहिता 148:10

देवाने सर्व जंगली प्राणी आणि पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.

यशया 11:6

त्या वेळेला लांडगे मेंढरांबरोबर सुखशांतीने राहतील, वाघ कोकरांबरोबर शांतपणे झोपेल. वासरे, सिंह, आणि बैल शांततेने एकत्र राहतील आणि एक लहान मुलगा त्यांना वळवील.

यशया 13:22

बाबेलोनच्या भव्य आणि सुंदर इमारतीतून रानकुत्री आणि लांडगे केकाटतील, बाबेलोन नष्ट होईल. त्याचा शेवट जवळ आला आहे. मी त्याचा नाश लांबणीवर टाकू देणार नाही.”

यशया 41:17

“गरीब आणि गरजू पाण्याचा शोध घेतात. पण त्यांना पाणी मिळू शकत नाही. ते तहानेलेले आहेत. त्यांच्या तोंडाला कोरड पडली आहे. मी त्यांनी केलेली आळवणी ऐकेन. मी इस्राएलचा देव, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

यशया 43:19

का? कारण मी आता नव्या गोष्टी घडवून आणीन. आता तुम्ही कोवळ्या रोपटयाप्रमाणे वाढाल. हे सत्य आहे, ने नक्कीच तुम्हाला माहीत आहे. मी खरोखरच वाळवंटातून रस्ता तयार करीन. कोरड्या भूमीवर नद्या निर्माण करीन.

यशया 48:21

परमेश्वराने त्याच्या लोकांना वाळवंटातून पार नेले पण ते तहानेलेले राहिले नाहीत का? कारण देवाने आपल्या माणसांसाठी खडकातून पाणी वाहायला लावले. त्याने खडक फोडला आणि पाणी बाहेर वाहू लागले.”

यशया 49:10

लोक उपाशी राहणार नाहीत. ते तहानेलेही राहणार नाहीत. तळपणारा सूर्य आणि उष्ण वारे त्यांना इजा करणार नाहीत. का? कारण देव त्यांचे दु:ख हलके करील आणि त्यांना घेऊन जाईल तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल.

यशया 55:1

“तहानलेल्यांनो, या आणि पाणी प्या. तुमच्याजवळ पैसा नसला तरी काळजी करू नका. या आणि पोटभर खा, प्या. अन्न आणि मद्य ह्यासाठी पैसे पडणार नाहीत.

यशया 65:15

माझ्या सेवकांना तुमची नावे शिव्यांसारखी वाटतील.” परमेश्वर, माझा प्रभू, तुम्हाला ठार मारील तो त्याच्या सेवकांना मात्र नव्या नावाने बोलावील.

यिर्मया 31:9

ते लोक रडत परत येतील. पण मी त्यांचे नेतृत्व करीन व त्यांचे सांत्वन करीन. मी त्यांना सोप्या वाटेने नेईन म्हणजे ते अडखळणार नाहीत. मी त्याना अशाच मार्गाने नेईन कारण मी इस्राएलचा पिता आहे आणि एफ्राईम माझा पहिला मुलगा आहे.

योएल 3:18

त्या दिवशी, पर्वत गोड द्राक्षरसाने पाझरतील, टेकड्यांवरून दूध वाहील, आणि यहूदाच्या कोरड्या पडलेल्या नद्यांमधून पाणी वाहील, परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील.

मार्क 13:20

देवाने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत.

योहान 4:10

येशूने उत्तर दिले, “देव काय दान देतो याविषयी तुला माहीत नाही आणि तुझ्या हातून पाणि मागणारा कोण हे देखील तुला माहीत नाही. तुला जर या गोष्टी माहीत असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस. आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते.”

योहान 4:14

परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.”

योहान 7:37

सणाचा शेवटचा दिवस आला. तो फार महत्वाचा दिवस होता. त्या दिवशी उभे राहून येशू मोठयाने म्हणाला, “ज्याला तहान लागली असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.

1 पेत्र 2:9

पण तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही राज्याचे याजक आहात, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही देवाचे असलेले लोक आहात, यासाठी की, ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अदभुत प्रकाशात आणले त्याची सामर्थ्यशाली कृत्ये तुम्ही प्रकट करावी.

प्रकटीकरण 17:14

ते कोकऱ्याबरोबर युद्ध करतील पण कोकरा त्यांच्यावर मात करील. कारण तो प्रभूंचा प्रभु व राजांचा राजा आहे.आणि त्याच्याबरोबर त्याने बोलाविलेले, निवडलेले, विश्वासू अनुयायी असतील.”

प्रकटीकरण 21:6

नंतर तो मला म्हणाला, “पूर्ण झाले आहे! मी अल्फा व ओमेगा, आरंभ व शेवट आहे. जो कोणी तहानेला आहे, त्यालामी जीवनी पाण्याच्या झऱ्यातील पाणी फुकट देईन.

प्रकटीकरण 22:17

आत्मा आणि नवरी असे म्हणतात की,“ये! आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये!” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तोफुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.

Interlinear

Choose Theme